नविन नांदेड। श्री१०८ स्वामी गंभीरबन महंत महाराज यांच्या १२ व्या पुण्यतिथी निमित्ताने दत मंदिर आनंद आश्रम इंदिरा नगर तुप्पा येथे अंखड दतनाम चातुर्मास सांगता सोहळा निमित्ताने आंंनद बन महाराज यांच्या काल्याचा किर्तनाने ८ नोव्हेंबर रोजी सांगता झाली असून या सोहळ्याला भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी सार्वजनिक महाप्रसादानी सांगता झाली.
प्रतिवार्षाप्रमाणे याही वर्षी २ते ८ नोव्हेंबर पर्यंत कार्तिकी पौर्णिमा पर्यंत दैनंदिन भजन काकडा आरती महापुजा भुपाळी आयोजन करण्यात आले होते या अखंड हारिनाम सोहळ्यात द.भ.प.मारोती पाटील शंभगावकर,माधव कोसबे मुगावकर, द.भ.प सौ.मैनाताई हिप्पनाळीकर,द.भ.प.प्रताप पाटील नटुरे पिंपळकौठेकर, द.भ.प. शहादत महाराज सरेगावकर यांचे किर्तन तर ८ नोव्हेंबर रोजी सकाळी तुप्पा गावातुन ढोलताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली हि मिरवणूक श्री दत मंदिर येथे आल्या नंतर श्री संत आंनदबन महाराज यांच्या काल्लयाचा किर्तनाने व महाआरती ,महाप्रसादाने सांगता झाली ,तर रात्री १२८ श्रीफळाची महापुजा करण्यात आली.
या सोहळ्याला आ.मोहनराव हंबर्ड , युवा नेते राहुल हंबर्डे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे,राजु मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य आंंनद गुंडीले, माजी ऊपसंरपच शेख चांद पाशा, यांच्या सह मान्यवरांच्यी ऊपसिथीती होती ,हा सोहळा यशस्वी होण्यासाठी बबन कदम, चिमणाजी पाटील ,शिवकांत कदम,बाबुशा शिंदे, बापुराव पवार,दता पाटील कदम, ज्ञानेशवर यन्नावार, व्यंकटराव चितळे,गुलाब कदम, महाजन कदम,श्रीराम पाटील कदम, यांच्या सह गावातील मान्यवर भक्तांनी परिश्रम घेतले. यावेळी अनेक गावातील भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे आयोजन संत आंनदबन गुरू गंभीरबन मंहत महाराज यांनी केले होते,या किर्तन सोहळ्याला गोळेगाव तपोवन, शंभरगाव, तुप्पा, बारूळ, केदरवडगाव,जाणापुरी यासह ग्रामीण भागातील अनेक गावातील भजनी मंडळ यांनी सहभाग नोंदविला होता.