जलतरण स्पर्धेत नांदेडचे वर्चस्व -NNL


नांदेड।
23 वी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा 8 व 9 ऑक्टोबर रोजी नांदेड येथे संपन्न झाली. ठरल्यानूसार उद्घाटक म्हणून लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी पवित्र गोदावरी तीर्थ जलतरणिकेत मिसळून स्पर्धेचा श्रीगणेशा केला. समारोपास नांदेडच्या प्रथम नागरिक महापौर सौ.जयश्रीताई पावडे ह्यांचे मार्गदर्शन लाभले. जलतरणिकेवरील अडचणी दोघांनीही जाणून घेतल्या व त्या सोडविण्याचे प्रयत्न करु असा संकल्प सोडला.

स्पर्धेत प्रांतातील 21 जिल्ह्यातून 270 स्पर्धकांची उपस्थिती लाभली. स्पर्धेची वैशिष्ठये म्हणजे नांदेडच्या स्पर्धकांनी 35 सुवर्ण, 22 रौप्य, 21 कांस्य पदकांची लयलूट केली. 326 गुणांकन प्राप्त करून नांदेडचा प्रथम क्रमांक तर 319 गुणांकन घेत नागपूर द्वितीय क्रमांक म्हणून नांदेडला विजेते पदाची प्रथम क्रमांकाची ढाल राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री.शिरभाते ह्यांचे हस्ते नांदेडच्या सर्व टिमने स्विकारली.


श्री.पांडूरंग गवते, जयप्रकाश क्षीरसागर, शिवाजी गोरे, कैलास झोळके, अजित पवार ह्यांनी 6-6 सुवर्ण पदक, 81 वर्षांचे देगलूरकर दादा व 79 वर्षांचे शरणप्पा ध्याडे यांनी 5-5 पदके प्राप्त केली. तर राष्ट्रीय अध्यक्ष श्री.अरुण (बापू) किनगावकर, उत्तम पाटील हातनीकर, गंगाधर बुचडे, चंद्रकांत लामदाडे, पंजाब काळे, प्रमोद कुलथे, चंद्रकांत लामदाडे यांनी प्रत्येकी 4-4 पदके प्राप्त केली. अविनाश पिल्ले, उल्लीवार, वंकलवार यांनी 3-3 पदके कमावली.

ऑलीपिक मध्ये ह्या वर्षीपासून मिश्र दुहेरी पुरुष-महिला रिले स्पर्धा सुरू झाल्या. राज्यस्तरीय स्पर्धेत मा.महापौर ह्यांनी शिटीचा संकेत देऊन त्या प्रकारची सुरुवात केली. त्या स्पर्धेचा मान कु.निॠती पिनलवाड, श्री.उत्तम पाटील हातनीकर, कु.अंजना शिंदे, प्रकाश बोकारे या उत्कृष्ट जलतरणपटूंनी भरपावसात प्रात्यक्षिकाने केली. त्यामुळे त्यांचा सत्कार मा.महापौर ह्यांचे शुभहस्ते करण्यात आला.


कुटूंब रंगलय गाण्यात अशी एक मालीका टी.व्ही वर होती त्या धर्तीवर कुटूंब डूंबलय पाण्यात अशी विक्रमी नोंद पोरवाल कुटूंबीयांनी केली. कुटूंबातील तीनही जण जलतरणपटू आहेत. श्री.श्रीपाल, सौ.प्रसन्न श्रीपाल व कु.तेजल श्रीपाल पोरवाल या तीघांनीही विविध प्रकारात पदकांची लूट केली. पुढील वर्षीच्या राज्यस्तरीय स्पर्धा नागपूर येथे ठरल्या आहेत.

गुडघा रिप्लेस केल्यावर अवघ्या 3 महिन्यात अपंग असूनही स्पर्धेत उतरुन 2 मेडल पटकाविण्याचा अचाट पराक्रम ओमप्रकाश गुंजकर यांनी केला. सचिव श्री.भास्कर अत्रे, प्रांत सचिव श्री.शेखर भावसार, श्री. चंद्रकांत लामदाडे, श्री.अशोक कोलते, श्री.दिनकर देशपांडे, श्री.पोरवाल सर्वच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व समाजातील अनेक मान्यवरांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी