हदगाव कारखाना प्रशासनाच्या विरोधात हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे साखर आयुक्तांना निवेदन -NNL


पुणे/हदगाव/नांदेड|
श्री सुभाष शुगर प्रा. लि. हडसणी या एकमेव साखर कारखाना प्रशासनाच्या नाकर्तेपणा आणि मनमानीमुळे आम्हा शेतकऱ्यास मोठ्या अडचणींचा समान करावं लागतो आहे. एवढेच नाहीतर कारखानाच्या वतीने शेतकऱ्यांच्या ऊसाचा सरासरी प्रत्यक्ष उतारा लपवुन भाव देत नाही. त्यासह विविध मागण्याचे निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड, महाराष्ट्र राज्य पुणे याना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. 

देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, आम्हीऊस उत्पादक शेतकरी तालुका हदगांव व तालुका हिमायतनगर जि. नांदेड येथील असुन, आमच्या दोन तालुक्यामध्ये श्री सुभाष शुगर प्रा. लि. हडसणी हा एक साखर कारखाना आहे. या कारखान्याकडे दोन तालुक्याचे कार्यक्षेत्र असुन, दरवर्षी या साखर कारखान्यास ऊस गाळपास जात असतो. परंतु दरवर्षी ही आम्हाला हा साखर कारखाना आमच्या ऊसास सरासरी ऊसाचा प्रत्यक्ष उतारा लपवुन भाव देत नाही. आमच्या असे लक्षात आले आहे की, हा साखर कारखाना दररोज होणारे ऊसाचे टनेज, निघणारी रिकव्हरी, गाळप झालेली साखरेचा उतारा अन्य काही माहिती फलकावर लावलेली नाही.

गळीत हंगाम चालु झाल्याच्या पहिल्या दिवसापासुन हा कारखाना ऊसाची ब्रिक्स तपासुन सरासरी ऊसास ९ .५ टक्के रिकव्हरी आल्याशिवाय ऊस तोडुन आनत नाही परंतु गळीत हंगाम चालु झाले त्या दिवशीची ब्रिक्स ९ .५ टक्के आणि मध्यंतरची ब्रिक्स १०.५ टक्के व शेवटची ब्रिक्स १३.५ टक्केच्या सरासरीनुसार हा साखर कारखाना फक्त दरवर्षीचा साखर ९ .६० टक्के चा उतारा दाखवुन त्यानुसार एफआरपी देत असतो. आमच्या ऊसाला भाव हा एफआरपी गुणीले साखर उतारा यानुसार भाव मिळतो. परंतु या साखर कारखान्याच्या मनमानीपणामुळे आमच्या घामाला दाम बरोबर मिळत नाही. स्पष्ट सांगायचे म्हणजे येणारी ऊसाची सरासरी रिकव्हरी लपवते आणि आम्हा शेतकऱ्यांना फसवते. 

म्हणुन आम्ही शेतकऱ्यांनी दिनांक १५/०२/२०२२ रोजी खालील मागण्याकरीता कारखान्यावर मोर्चाचे आयोजन केले होते. मागण्या हया खालीलप्रमाणे होत्या. १) केंद्र शासनाच्या सन २०२०-२१ च्या वर्षातील गाळप हंगामानुसार एफआरपी दराप्रमाणे ऊसाला भाव जाहीर करावा.२) ऊस गाळपास आल्यापासुन १४ दिवसात एकरकमी बिल देण्यात यावे अन्यथा विलंब झाल्यास दरसाल दरशेकडा १५ टक्के व्याज लावुन बिल देण्यात यावे. ३) २०२१-२२ गळीत हंगाम मधील ऊसाच्या रिकव्हरीकरीता कारखान्याने किमान ऊस उत्पादक पाच शेतकरी, प्रशासकिय अधिकारी व कारखाना अधिकारी यांनी एकत्र येवुन ऊस गाळपास आल्यापासुन ते ऊस हंगाम संपेपर्यंत रिकव्हरीची नोंद घेण्यास कमेटीची स्थापना करण्यात यावी. 

को. एम. २६५ या जातीच्या ऊसास जाहीरपणे मान्यता द्यावी. ४ ) आमच्या वरिल मागण्या स्पष्ट करुन सांगायचे म्हणजे पहिल्या मागणीचे कारण: - हा साखर कारखाना मागील वर्षीच्या ढोबळ एफ.आर.पी. नुसार २०२१ / २२ च्या ऊस हंगामानुसार ऊसाचा हप्ता देत नाही त्याकरीता पहिली मागणी आहे. दुसऱ्या मागणीचे कारण : - हा साखर कारखाना ऊस गाळपास आल्यापासुन ६० दिवसाच्या नंतर प्रतीटनाला २००० रुपये पहिले बिल काढतो आणि आमच्याकडील काही शेतकऱ्यांना फसवणुक करुन त्यांची वैयक्तिक साखर उतारा कमी दाखवुन त्यांना दर प्रती टनाला १०८८ रुपयाचे बिल काढतो. 

तिसऱ्या मागणीचे कारण : - ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार हा कारखाना प्रती टनास २.५ टक्केची रिकव्हरी लपवतो त्याकरिता आमच्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की , या साखर कारखान्यावर ऊसाच्या रिकव्हरी व साखर गाळप व ऊसाचे प्रतीदिवसाचे टनेज यावर मा . साखर आयुक्त साहेबांनी तज्ञ अधिकारी यांची नियुक्ती करावी यामुळे हा कारखाना ऊसाच्या उताऱ्यात फसगत करण्याचे • टाळेल व ऊसाला योग्य तो भाव मिळेल. चौथी मागणीचे कारण : - श्री सुभाष शुगर प्रा . लि . हडसणी हा साखर कारखाना को.एम. २६५ या ऊसाच्या जातीस लागवड करण्यास शेतकऱ्यांना टाळाटाळ करतो. काही शेतकऱ्यांना लावण्यास परवानगी देतो परंतु आम्ही या ऊसाच्या जातीस १६ महिण्यानंतर गाळपास नेवू असे सांगुन त्यांच्या नोंदी घेतो. याचे स्पष्ट कारण म्हणजे या साखर कारखान्यास ऊसाच्या रिकव्हरीमध्ये रिकव्हरी लपवण्यास जमत नाही. 

म्हणुन लागवड परवाना देण्यास टाळाटाळ करतो. कार या वरिल मागण्याकरिता आम्ही सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. परंतु संचालकांनी आमच्या मोर्चाच्या मागण्यांना उत्तर न देण्यासाठी हजर राहीले नाहीत. म्हणुन आम्ही सर्व शेतकऱ्यांनी प्रादेशीक सह साखर संचालक नांदेड यांच्याकडे दिनांक २३/०२/२०२२ रोजी वरिल मोर्चाच्या मागण्याकरिता कारखाना संचालक साहेब गैरहजर असल्यामुळे निवेदनाव्दारे प्रादेशिक साखर सह संचालक नांदेड यांना निवेदन देवुन कळविले होते. साखर सह संचालकांनी कारखान्यास आमच्या विविध मागण्याकरीता दिनांक ०८/०३/२०२२ रोजी ई मेलव्दारे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुभाष शुगर प्रा. लि. हडसणी ता. हदगांव जि. नांदेड यांना आमच्या विविध मागण्यास उत्तर देण्यास ईमेलव्दारे कळविले होते. 

परंतु अद्याप पर्यंत आपल्या कार्यालयाकडुन आम्हास आमच्या मागण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळालेले नाही. म्हणुन आम्ही सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या कार्यालयास विविध मागण्याचे समाधान करण्यासाठी मा. साखर आयुक्त साहेबांनी श्री सुभाष शुगर प्रा. लि . हडसणी या कारखान्यावरती ऊसाची रिकव्हरी व दररोज होणारे साखरेचे गाळप यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरीता तज्ञ अधिकाऱ्यांची नेमणुक करावी. कारण दरवर्षी हा साखर कारखाना आम्हास रिकव्हरी व साखरेचे गाळप लपवुन सरासरी रिकव्हरी लपवुन ऊसाला मिळणारा दर कमी मिळत आहे. त्याकरीता आपणास वरील मागण्याचा विचार करुन व चौकशी करुन रात्रंदिवस काबाड कष्ट करुन पिकवत असलेल्या ऊसाची रिकव्हरी लपवित आहेत व मनमानी करुन शेतकऱ्यांची फसवणुक करीत आहेत. 

सदरील कारखाना संचालकास आम्ही हदगांव हिमायतनगर तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखानदारास काही विचारपुस केली असता तेथील कारखानदार संचालकानी आम्हा सर्व शेतकऱ्यांना असे सांगीतले की, आमचा कारखाना हा आमच्या स्वतंत्र मालकीचा असुन तुमचे काहीही ऐकुण घेणार नाही असे म्हणाले. त्यामुळे साखर आयुक्त साहेबांनी आमच्या मागण् योग्य तो विचार करुन आम्हा शेतकऱ्यांस न्याय मिळवून द्यावा तसेच वरील विषयावर योग्य ती कार्यवाही करुन आम्हास कळवावे ही विनंती. असेही निवेदनात लिहिले आहे, या निवेदनावर गंगाधर धोंडबाराव कदम रा. फळी ता. हदगांव, तुकाराम रेशमाजी कदम रा. फळी ता. हदगांव, सिताराम नाथराव कदम रा. फळी ता. हदगांव, गजानन गणेशराव कदम रा. फळी ता. हदगांव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी