जि.प.हायस्कूल बेटमोगरा येथील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मिळावा संपन्न
मुखेड, रणजित जामखेडकर। "अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूनी जाती" या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही पाखरे परत एकदा शाळेच्या प्रांगणात उतरली.मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील जि.प. हायस्कूल मध्ये सन १९९५ मधील दहावी बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल २७ वर्षानंतर रविवार दि.८ में २०२२ रोजी आयोजित स्नेह संम्मेलनाच्या माध्यमातून पुन्हा भेटली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बेटमोगरा येथील शिवलिंग बादशहा मठसंस्थानचे मठाधिपती सदगुरु डॉ. सिद्धिदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर व उद्घाटक म्हणून ह.भ.प. योगेश्वर प्रकाशदेव जोशी महाराज यांची उपस्थिती होती. यावेळी,प्रमुख पाहुणे म्हणून या बॅचचे शिक्षक माधवराव हेळगीरे धामणगावकर,विश्वंभर उकादवडे, गोपाळराव पुजारी,बालाजी सकीनवार यांच्या सह जि.प.हायस्कूल चे मुख्याध्यापक वाय डी. भैरवाड,पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नामदेव यलकटवार,पत्रकार मुस्तफा पिंजारी,संपादक भारत सोनकांबळे,एम.एम.राठोड, ए.जी. बतकुलवार,श्रद्धा रणविरकर, संगीता माळगे सह मौला मामा यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजन व राष्ट्रगीताने करण्यात आली.तसेच दरम्यान च्या काळात काही मित्र व शिक्षक यांचे निधन झाले त्यांना सामुहिकरित्या श्रद्धांजली वाहण्यात आली. या स्नेह संम्मेलनाच्या माध्यमातून तब्बल २७ वर्षानंतर ४२ मित्र-मैत्रिणी एकत्रित आल्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.तसेच शाळेतील मस्ती,एकत्रित पणे कलेला अभ्यास,शिक्षकांच्या विद्यार्थ्यांवरील वचक,शाळेतील क्रीडा स्पर्धा,शिक्षकांनी दिलेली शिक्षा,स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धुम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
असा हा अनोखा उपक्रम राबवत मैत्रीचे बंधन अतुट राखण्यासाठी १९९५ मधील दहाव्या वर्गातील सर्व मित्र परिवारांच्या सहकार्याने हा स्नेह संम्मेलन सोहळा यशस्वीरीत्या पार पडला आहे. प्रसंगी या व्यासपीठावरील अध्यक्ष, उद्घाटक व प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.दत्ता पाटील,संतोष मुक्कावार यांनी केले तर आभार बळवंत टेकाळे यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली होती. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक-शिक्षिका सह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.