नांदेड| केरळ राज्यातील त्रिसूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय गामा अबॅकस स्पर्धेत नांदेडच्या मेधावी महेंद्र पिंपळगावकर या विद्यार्थीनीने उत्कृष्ट कामगिरी करत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
मेधावी ही ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी आहे. तीला गामा अबॅकस पावडेवाडी सेंटर नांदेड येथील सौ. संगीता कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. मेधावीने यापूर्वी नाशिक येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय गामा अबॅकस स्पर्धेत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला होता. राष्ट्रीय स्पर्धेतील तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.