वजिराबाद पोलीस ठाण्यात महेश शर्मा प्रभारी पोलीस निरीक्षक

नांदेड|
शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले हे आजारी रजेवर पुणे येथे उपचारासाठी रवाना झाल्यानंतर वजिराबादच्या प्रभारी पदावर पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना सध्या नियुक्ती देण्यात आली आहे. महेश शर्मा एक चांगले पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात,ते उदगीर येथून नांदेडला आले आहेत.मराठवाड्यात सर्वत्र त्यांची चांगलीच ख्याती आहे. 
                       
25 जुलै रोजी एका व्हाट्स अप ग्रुपवर घडलेल्या  चर्चे नंतर वजिराबादचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांचा रक्तदाब वाढला आणि ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले.ते दोन दिवस वैद्यकीय निरीक्षणात राहिले.दुसऱ्या दिवशी त्यांना पुणे येथे तपासणी करण्याच्या शिफारसीसह सुट्टी देण्यात आली.तिसऱ्या दिवशी अर्थात 27 जुलै रोजी दुपारी ते पुण्याकडे रवाना झाले.सायंकाळी उशिरा वजिराबाद पोलीस ठाण्याच्या सध्या रिकाम्या जागेवर सध्यापुरती नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. या जागेवर पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 
                           
संदीप शिवले पुणे कडे जाण्यासाठी नांदेड शहर सोडल्यावर ते पुन्हा येण्याची शक्यता कमीच असल्याची एक पोस्ट व्हाट्स अप ग्रुपवर आली होती.पण खरे काय काय घडले हे कोणालाच माहिती नसतांना व्हाट्स अप ग्रुपवर झालेल्या वायफळ पोस्टने शिवले सारख्या उत्कृष्ठ अधिकाऱ्याच्या कारकिर्दीत डाग नक्कीच लागला आहे. प्रभारी,तात्पुरते,सध्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी वजिराबाद भागातील सर्व सामान्य माणूस आपला केंद्र बिंदू मानून काम करावे आणि पोलीस दलाचे नाव उज्वल करावे अशी शुभकामना नांदेड न्यूज लाईव्ह सुद्धा देत आहे.  

...रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी