नांदेड। शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी श्रीमती शैलजा नृसिंहराव दांडगे यांच्या निधनाबद्दल पत्रकार अभयकुमार दांडगे यांच्या निवासस्थानी भेट देऊन दांडगे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी श्रीमती शैलजा दांडगे यांच्या स्मृतीला पुष्प वाहिले. त्यानंतर शिवसेनेच्यावतीने श्रीमती शैलजा दांडगे यांना एक मिनिट उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, सहसंपर्कप्रमुख डॉ. मनोजराज भंडारी, प्रकाश मारावार, भुजंग पाटील,नेताजी भोसले , प्रदीप उर्फ पप्पू जाधव,माधव पावडे, प्रमोद उर्फ बंडू खेडकर, धनु वाघमारे, जितू सिंग टाक , सचिन पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.