श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयाचा अमोल सरोदे बीजेएमएस अभ्यासक्रमात सर्वप्रथम -NNL


अर्धापूर, निळकंठ मदने|
येथील श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयाच्या मीडिया स्कूल मधील बीजेएमएस अर्थात बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मीडिया सायन्स अभ्यासक्रमाच्या उन्हाळी २०२२ परीक्षेचा निकाल घोषित झाला आहे. महाविद्यालयाचा सरोदे अमोल उद्धवराव हा विद्यार्थी ७२. ६७% गुण घेऊन महाविद्यालयातून सर्वप्रथम आला आहे. महाविद्यालयाची विद्यार्थिनी पवार स्नेहा रामदास ही ६७.३३% गुण घेऊन महाविद्यालयात मुलींमधून सर्वप्रथम आली आहे. मगरे भावना कपिल ही ६६.१३% गुणांसह मुलींमध्ये सर्व द्वितीय ठरली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे बी जे एम एस अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. विद्यापीठाने नुकतेच बीजेएमएस या एक वर्षीय अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर केला. महाविद्यालयाचे एकूण ५० विद्यार्थी बीजेएमएस अभ्यासक्रमाच्या परीक्षेला बसले होते. यामध्ये ४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यापैकी तब्बल ३० विद्यार्थी ६० पेक्षा अधिक गुण प्राप्त करीत प्रथम श्रेणीमध्ये झळकले आहेत. वाघमारे केशव पिराजी हा ६८.२७% गुण मिळवत महाविद्यालयातून सर्व द्वितीय तर सरकुंडे सागर भाऊराव हा ६७.६०% गुण घेत महाविद्यालयातून तिसरा आला आहे.

बीजेएमएस अभ्यासक्रमात गुणवंत ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थापक - प्राचार्य डॉ. विकास लिं. कदम, प्रा. डॉ.  दिलीप शिंदे, प्रा. डॉ. विलास ढवळे, प्रा. शुद्धोधन एडके, प्रा. अमोल धुळे, प्रा. संजय नरवाडे, प्रा. विपिन कदम,  प्रा. अशोक डोंगरे, प्रा. प्रवीण खंदारे, प्रा. जगदीश केंद्रे आदींनी स्वागत केले आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी