नांदेड| नोबल सायन्स फाऊंडेशनकडून घेण्यात आलेल्या सायन्स टॅलेंट सर्च परिक्षेत सिद्धांत भगवान कंधारे या विद्यार्थ्यांने राज्यातून १९ वा येण्याचा बहुमान मिळविला आहे़. नोबल फाऊंडेशनकडून सायन्स व तंत्रज्ञानावर आधारित ही परिक्षा घेतली जाते़ राज्यभरातून जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली होती़ यात सिद्धांत कंधारे याने राज्यात १९ वा क्रमांक मिळविला आहे़ या यशाबद्दल त्याचे अनेकांनी कौतुक केले़
अस्मिता कंधारे कला शाखेत प्रथम
नांदेड शहरातील प्रतिभा निकेतन महाविद्यातील विद्यार्थीनी कु़ अस्मिता भगवान कंधारे हि कला शाखेत इंग्रजी माध्यमातून महाविद्यालयात प्रथम आली आहे़. स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून पदवी, पदवीत्तर परिक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे़ यात कु़ अस्मिता भगवान कंधारे हिने एकूण गुणापैकी तिने ८१़३१ टक्के गुण मिळविले आहेत़ बारावी उत्तीर्ण झाल्यावर तिचा आयआयटीला नंबर लागला होता़ परंतू ती संधी नाकारून आयएएस होण्याचे ध्येय ठेवून माजी सनदी अधिकारी ई़ झेड़ खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू केली आहे़ या यशाबद्दल अस्मिताचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे़