नांदेड/कंधार| सोयरीक होत नसल्याने एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कंधार तालुक्यातील मौजे रुई येथे दि.९ सप्टेंबर रोजी घडली आहे. व्यंकट नागेश श्रीरामे (२५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
रुई येथील व्यंकट नागेश श्रीरामे यांनी ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते १० वाजेच्या दरम्यान, त्याचे लग्न जुळत नसल्याने तणावात राहून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी देविदास नागेश श्रीरामे (२३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, कंधार ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.