नवीन नांदेड। महात्मा गांधी प्राथमिक विघालयात शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके व पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दप्तर ,वह्या व पुष्पगुच्छ देऊन स्वागत मुख्याध्यापक कानवटे .एस.एच. व पालक व शिक्षक यांच्या उपस्थितीत देण्यात आले या वेळी शालेय पोषण आहार म्हणून गोडभात देण्यात आला.
श्री.सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड संचलीत महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय सिडको नांदेड येथे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब जाधव, कोषाध्यक्ष नगरसेवक श्रीनिवास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेतील विद्यार्थी यांना मोफत पाठ्यपुस्तके व वह्या देऊन तर पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दप्तर वह्या पुस्तके मोफत देण्यात आली.
पहिल्याच दिवशी शालेय पोषण आहार मध्ये गोडभात देण्यात आला.शाळेतील शिक्षक यांनी नियोजन बद्ध कार्यक्रम आयोजन केले होते,या वेळी शाळेतील शिक्षक निवळे ए.एस,राऊत एस, व्हि,श्रीमती मामीडवाड एस.एल.घोणसे एस.एन.ऊपलेचंवार, एम.एम,सौ.राठोड, एल.आर.मुसळे ,ए.एन यांनी परिश्रम घेतले. पहिल्या दिवशी शाळेतील विद्यार्थी मध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.