नायगाव, दिगंबर मुदखेडे| नांदेड मधील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक संजय बियाणी यांनी अनेक ठिकाणी दरर्जेदार घराचे बांधकाम करून ज्याचे आर्थिक उत्पन्न कमी आहे. अश्या व्यक्तींना अल्प दारात अनेकांना स्वतःचे घरे उपलब्ध करून दिले तर अनेक गोर- गरिबाना मोफत घरे देण्याचं महान कार्य संजय बियाणी यांनी केले असून, संजय बियाणी यांनी घरच नव्हे तर त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून अनेकांना मदतही करत होते.
मंदिर बांधकाम असो कुणाची लग्नाचं असो अश्या विविध प्रकारच्या अडचणीत ते नेहमीच पुढाकार घ्यायचे असया देवरूपी उद्योगपती असलेल्या संजय बियाणी यांची भरदिवसा स्वतःच्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असल्याने याप्रकरणी संबंधित पोलीस प्रशासनाने संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्या पाठीमागे अजून किती लोकांचा पाठिंबा आहे याचाही शोध घ्यावा अशी मागणी नायगाव वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रामकिशन पालनवार यांनी केली आहे.
नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील रहिवाशी असलेले बांधकाम उद्योजक संजय बियाणी यांची स्वतःच्या घरासमोर भरदिवसा जिल्ह्याच्या ठिकाणी गोळ्या झाडून हत्त्या केली जाते. आणि सदरची घटना पहिली नसून, अश्या घटना आठव्यांदा घडल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रसिद्ध बांधकाम उद्योगपतीची भरदिवसा हत्या कारण्यात येते. तर जनसामान्य नागरिकांचे काय हाल होणार...? संबंधित प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जातीने लक्ष देऊन संजय बियाणी यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांना कडक शिक्षा द्यावी अन्यथा मा.गृहमंत्री यांची भेट घेणार असल्याचे रामकिशन पालनवार यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले.