शंकरराव भरकड यांचे अल्पशा आजाराने निधन-NNL


किनवट, माधव सूर्यवंशी।
साप्ताहिक किनवट समाचारचे मुख्य संपादक तथा किनवट तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शंकरराव भरकड यांचे अल्पशा आजाराने कमठाला येथिल त्यांच्या राहत्या गावी आज (२८ जूनच्या पहाटे २ वाजता) दुःखद निधन झाले असून, दुपारी अंत्यविधीही पार पडला. मृत्यू समयी ते ७० वर्षाचे होते. 

कमठाला येथील स्व.भरकड रहिवाशी होते. मारोती भरकड यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुलं, एक मुलगी, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे. साधा आणि सरळ स्वभाव होता. पत्रकार संघाचे अध्यक्षपद हे लोककल्याणासाठी कामी लावले होते. कांही पत्रकारांवर राजकारण्यांनी हल्ला केला तो क्षण विसरता येणार नाही. त्याहीवेळी स्व.भरकड हे धाडसाने पुढे आले होते. अनेकांनी शोकसंदेश व्यक्त केला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी