तलाठ्याला चकमाँ देऊन अवैद्य वाळू माफिया झाला टिप्पर घेऊन फरार;गुन्हा दाखल -NNL

अधिकाऱ्याशी अरेरावीची भाषा करून मोटर सायकलची चाबी काढुन घेवुन पसार 


नांदेड, शेख मौला| नांदेड ग्रामीण हद्दीत दि.१४ रोजी सायंकाळी ५.१३ वाजेच्या सुमारास वाडी पुयड रोडवर महसुलाचे अधिकारी व कर्मचारी अवैद्य रेती बाबतीत गस्तीवर असताना बेकायदेशीर रित्या वाहतूक करत असलेले वाहन थांबवून विचारपूस केली. दरम्यान वाहनचालक व मालकाने अधिकाऱ्याचे न ऐकता वाहन घेऊन पसार झाले. याबाबत पोलिसात शासकीय कामात अडथळा केल्याची नोंद करण्यात आली असल्याने वाळू माफियात खळबळ उडाली आहे. 

पोलीस डायरीत झालेल्या नोंदीनुसार नांदेड ग्रामीण वाडी पुयड रोड जवळील भगवान कदम यांचे घराजवळ ता. जि. नांदेड येथे फिर्यादी व साक्षीदार हे अवैध गौण खनीज वाहतुक प्रतिबंध करण्यासाठी शहरालगत वाजेगाव महसुली चौकीची पाहाणी करण्यासाठी वाजेगाव बायपास रोडवर महसुलाचे अधिकारी आले होते. दरम्यान वाडीपुयड रोडवरील भगवान कदम यांचे घराजवळ टिपर कं एमएच-२२ / एन-१८२२ हा विना परवाना बेकादेशिर रित्या रेतीची चोरटी वाहतुक करीत असतांना थांबले असल्याचे मिळुन आले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सदर टिपर चालकास परवाना विचारले असता त्यांनी नसल्याचे सांगितल्याने टिपर तहसिल कार्यालय नांदेड येथे जमा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी केल्या. 

त्यावेळी टिपरचा मालकाणे वाहनाजवळून येवुन अरेरावीची भाषा  वापरली तसेच मालकाने व चालकाने टिपर नांदेडकडे न घेता वाडी पुयडकडे घेवुन पळुन गेले. त्यावेळी साक्षीदार मंडगीलवार यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता टिपर मालकाने मंडगीलवार यांच्या मोटार सायकलची चाबी काढुन घेवुन अरेरावीची भाषा वापरून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. वगैरे फिर्यादी खुशाल रंगनाथराव घुगे, वय ५२ वर्षे, व्यवसाय मंडळ अधिकारी वाजेगाव ने तहसिल कार्यालय नांदेड, रा. दिपनगर तरोडा नाका नांदेड यांनी दिल्यावरुन पोस्टे नांदेड ग्रामीण येथे गुरनं १५२/ २०२२ कलम ३५३, ३७९, ३४, भादवी सह कलम म. ज. म. अघि कलम ४८ (७) (८) कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोउपनि.श्री हंबर्डे, करीत आहेत.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी