नांदेड| गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दोन दिवसापासून चांगलाच जोर पकडला आहे. नांदेड जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली.
ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून नांदेड जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. जवळपास २० दिवस पाऊस झाला नाही. परिणामी पिकांनी माना टाकल्या होत्या. दरम्यान, मागील चार दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली. शनिवारी रात्रीपासूनच जिल्ह्यातील नांदेडसह माहूर, किनवट, हिमायतनगर, भोकर येथे जोरदार पाऊस झाला. ओढे, नाले ओसंडून वाहत होते. माहूर येथील हरडफ या गावात अतिवृष्टी झाली. तसेच बिलोली तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. यामुळे उर्वरित शेती पिकेही नौकांची येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अगोदर मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने बळीराजाचे कंबरडे मोडले होते. त्यानंतर उर्वत्रित पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड सुरु केली. पिकांना उभारी येऊ पाहत असताना पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने फुल-फळावर असलेल्या पिकामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे.
दि.८ रोजी वीज पडून भोकर येथे शेतीत पतिराजाला जेवण वाढवणं करीत झाडाखाली उभी राहिली असताना अचानक आभाळात वीज कडाडली आणि अंगावर पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 38.70 मि.मी. पाऊस
नांदेड जिल्ह्यात सोमवार 12 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 38.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 983.50 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सोमवार 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 24 (956.60), बिलोली-33.80 (969.30), मुखेड- 14.80 (878.40), कंधार-7.40 (856.10), लोहा-12.20 (874.70), हदगाव-25.70 (874.30), भोकर-44.80 (1071.80), देगलूर-20.30 (821.20), किनवट-117.80 (1228.40), मुदखेड- 24 (1108.80), हिमायतनगर-80.90 (1252.50), माहूर- 91.10 (1051.70), धर्माबाद- 50.90 (1201.60), उमरी- 27.50(1135.40), अर्धापूर- 27.60 (890.80), नायगाव-29 (871.00) मिलीमीटर आहे.