●माजी सरपंच बाबाराव पाटील गवते यांची तक्रार ● चौकशी समितीचा अहवालानंतर कार्यवाही
लोहा| नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात येणाऱ्या मौजे पेनूर ग्रामपंचायत मध्ये १५ व्या वित आयोगाच्या निधीतून स्वतः काम केले. मुलाच्या नावे २ लक्ष ५२ हजार रुपये व ४ लक्ष १५ हजार रुपए असे एकूण ६ लक्ष ६७ हजार रुपये निधी तसेच शौचालय अनुदानात अपहार केल्याचे चौकशी अहवालात सिद्ध झाले. त्यावरून या गावचे ग्रामसेवक डी पी राठोड याना निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश गटविकास अधिकारी शैलेश वाव्हूले यांनी निर्गमित केले आहेत.
लोहा तालुक्यातील पेनूर ग्रामपंचायत येथील १५ व्या वित आयोगाच्या निधी अपहार प्रकरणी या गावचे माजी सरपंच व भाजपा किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबाराव पाटील गवते यांनी लेखी तक्रार केली होती.त्या अनुसंगाणे पेनूर येथील तक्रारी बाबत चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती त्या समीतीने आपला अहवाल मागील महिन्यात सादर केला होता
ग्रामपंचायत पेनुर येथील प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने या कार्यालयातील विस्तार अधिकारी ( पं ) यांनी चौकशी करून चौकशी अहवाल या कार्यालयास सादर केलेला आहे. सादर केलेल्या चौकशी अहवालात श्री.डी.पी.राठोड ग्रामसेवक ग्रामपंचायत पेनुर ता.लोहा यांनी १५ वा वित्त आयोगाचे काम स्वतः करून त्याच्या मुलाच्या नावे रक्कम रुपये २ लक्ष, ५२,हजार ३७० -व ४लक्ष १५,हजार ३५२ / - इतके उचलून शासनाची फसवणूक करणे तसेच शौचालय अनुदानात लाभार्थ्याची रक्कम रुपये ६०, हजार इतके स्वतःच्या नामे उचल करून घेणे . व तसेच इतर कामात अनियमीतता केल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट होते.
१५ वा वित्त आयोगाच्या कामात एकंदरीत रक्कम रुपये ६,लक्ष ६७,हजार ७१२ रुपये इतक्या रक्कमेचा अपहार केल्याचे व शौचालय अनुदान रककम रुपये ६०, हजार - इतक्या रक्कमेचा अपहार केलयाचे चौकशी अहवालात नमुद केले आहे. पेनूर ग्रामपंचायत चे ग्रामसेवक .डी.पी.राठोड ग् यांनी १५ वित्त आयोग व शौचालय अनुदानात अपहार केल्याचे शिध्द होत असल्यामुळे संदर्भ क्र. ( ४ ) नुसार बीडीओ याना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून डी.पी.राठोड ग्रामसेवक ग्रामपंचायत पेनुर यांना ०७.जून पासुन जिल्हा परिषद सेवेतून निलंबीत करण्यात आले तसे आदेश आज बुधवारी कधी काढण्यात आले. माजी सरपंच बाबाराव पाटील गवते यांनी ग्रामसेवकांवर निलंबन कार्यवाही झाली पण सरपंच व ग्रामसेवक या दोघांच्या सहीने पैसे उचलण्यात आले तेव्हा सरपंच यांच्यावर कार्यवाही कधी होणार असा सवाल उपस्थित केला आहे.