हदगाव, शे.चांदपाशा| महाराष्ट्रात आलेल्या गुलाब वादळामुळे संपूर्ण संपूर्ण मराठवाड्यात प्रचंड अतिवृष्टी झाली असून संपूर्ण नांदेड जिल्हा जलमय झाला आहे. हदगाव तालुक्यातील पुरपरिस्थीती बाबत कार्यकर्ते यांच्या कडून माहिती गोळा करून हदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात तालुका अध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत हदगाव हिमायतनगर तालुक्यात दि.२५ ते २८ तारखेला सतत चार दिवस अतिवृष्टी झाली असल्याने पक्ष नेतृत्वाकडे लेखी पत्राने पाठपुरावा करून दोन्ही तालुक्यातील शेतकरी जनतेला सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरले. हदगावचे तहसीलदार यांच्या मार्फत शेतकरी बांधवांच्या आर्थिक मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हदगाव च्या वतीने मुख्यमंत्री ना उध्दव ठाकरे यांना निवेदन दिले आहे.
या अतिवृष्टीमुळे खरिप हंगामाचे तुर कापुस, ज्वारी, सोयाबीन, हळद,उस, इत्यादी पीके जमीनदोस्त झाले आहेत. तालुक्यातील कयाधू व पैनगंगा नदीला महापूर आला होता. त्यात इसापूर व येलदरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले गेले, त्यामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्यात जल प्रलय झाला. त्यामुळे नदी क्षेत्रातील पीके खरडून गेले. नांदेड - नागपूर महामार्ग दोन दिवस बंद होता.अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी जनतेचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. शेतकरी बांधवांना सरकारने व मुख्यमंत्री ना उध्दव ठाकरे यांनी अतिवृष्टी ग्रस्त शेतक-यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी व शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हदगावचे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे.
या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष डाॅ देवराव नरवाडे पाटील, जिल्हा सचिव राजेश माने, माजी नगरसेवक गणपतराव हुलकाने, शाम लाहोटी, सामाजिक न्याय विभागाच अध्यक्ष प्रा राजेश राऊत, शहर अध्यक्ष फेरोजखान म.अलिखान, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अमोल कदम रुईकर, हदगाव शहर अध्यक्ष अभिजीत रूद्रकंठवार ,माजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष विनायक क्षीरसागर, प्रभाकरराव महाजन माजी सरपंच तामसा, हिदायतखान पठाण सदस्य ग्रा प तामसा, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष आनंद कल्याणकर, हदगाव शहर राष्ट्रवादी युवक चे उपाध्यक्ष निहाल पटेल,हदगाव शहरसचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुनिल मगर, विद्यार्थी सचिव मंगेश कदम, मधुकर हडसनकर, राजू वानखेडे, सलमान खान पठाण यांच्या निवेदनावर सह्या आहेत.