माधवराव पांडागळे यांचे धार्मिक कार्य वाखाणण्या जोगे- जगद्गुरू -NNL


नवीन नांदेड।
माधवराव पांडागळे यांचे धार्मिक आणि सामाजिक कार्य हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे, असे प्रतिपादन श्री श्री श्री १००८ रावल पदवी विभुषीत भिमाशंकरलिंग शिवाचार्य केदार जगद्गुरू महाराज शिराढोणकर यांनी केले आहे. 

नवीन नांदेड परिसरातील गोपाळचावडी येथील संगमेश्वर मंगल भवनात ३ ऑक्टोबर रोजी कंधार पं. स.चे माजी सभापती तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते माधवराव पांडागळे, डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, माजलगावकर महाराज, राज्याचे माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, सिताराम'आप्पा' एकलारे व चंद्रभान पाटील जवळेकर यांना संयुक्तरित्या श्रद्धांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमास माजी आ. ईश्वरराव भोसीकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, विठ्ठलराव माकणे, बालाजीराव पांडागळे, माधवराव पटणे, राज्याचे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे तसेच सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

जगद्गुरू भिमाशंकरलिंग महाराज पुढे म्हणाले, जन्माला येणाऱ्या सर्वांसाठी मृत्यू हा अटळ आहे. माधवराव पांडागळे समाजाकरिता आधारस्तंभ नसून शिराढोण येथील मठासाठी, धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचेही निर्माणकर्ते होते, असे सांगून माधवराव पांडागळे यांचे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे होते, असे यावेळी उपस्थितांना जगद्गुरू भिमाशंकर महाराजांनी आवर्जून सांगितले. 

प्रारंभी, डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव पांडागळे आदींच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करुन विनम्रपणे अभिवादन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ता संतोष पांडागळे, दिगंबर पेटकर, डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर, विठ्ठलराव माकणे, अवधूत शिवणे व  नांदेड जि. प.चे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे आदी मान्यवर  मंडळींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सभापती दिवंगत माधवराव पांडागळे यांच्या जीवन तसेच कार्यावर प्रकाश टाकला. त्याचवेळी, माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी, निस्वार्थपणे जगणे हे कसे असते.

याचे चित्र आम्ही माधवराव पांडागळे यांच्या कार्याच्या माध्यमातून पाहिले असल्याचे नमूद करुन समाजासाठी शेवटपर्यंत  वाहून घेतलेले 'व्यक्तिमत्त्व' म्हणजे, माधवराव पांडागळे असल्याचे आवर्जून सांगितले. याप्रसंगी शिवदासराव धर्मापुरीकर, व्यंकटराव माली पाटील, बालाजी पाटील पांडागळे, बापूराव देशमुख, खुशाल पाटील पांडागळे, नागोराव पाटील आलेगावकर, संतोष पांडागळे व माजी नगरसेविका डॉ. करूणाताई जमदाडे यांच्यासह शेख मोईन लाठकर, हरीभाऊ नाईकवाडे, रावसाहेब सावते, देवराव पांडागळे यांच्यासह शिराढोण, उस्माननगर, किवळा, बोरगाव, टेळकी तसेच गोपाळचावडी व परिसरातील बहुसंख्य कार्यकर्ते तथा भाविकांची उपस्थिती होती. 

प्रास्ताविक व सूत्रसंचालन व्यंकटराव मालीपाटील यांनी केले, तर खुशालराव पाटील पांडागळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी