संजय काईतवाड यांनी केली उपकार्यकारी अभियंता लोणे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी
हिमायतनगर| गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या विजेच्या लपंडावामुळे शेतकरी व सर्वसामान्य ग्राहक वर्ग हैराण झाला आहे. त्यातच अधिक विजेचा भार असल्यामुळे आता डीपी भ्रष्ट होऊन शेतकरी वर्गाची अडचण होते आहे. हि बाब लक्षात घेऊन तात्काळ अधिक क्षमतेचा डीपी बसवून शेतकऱ्यांची व गावकऱ्यांची होणारी परेशानी सोडवावी अशी मागणी शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड यांनी उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
गेल्या काही महिन्यापासून विजेचा भार अधिक वाढत असल्याने अनेक ठिकाणच्या रोहित्र जळंन्याचे प्रकार वाढतच आहेत. असाच प्रकार बोरगडी शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोपान डीपीची क्षमता २५ आहे. त्यामुळे विजेचा अधिक भार वाढून आजघडीला येथे ५० चा लोड होतो आहे. त्यामुळे वारंवार जळंन्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या पिकांचे निक्सन होत असून, या नुकसानीपासून वाचविण्यासाठी आणि यापासून शेतकऱ्यांना कायम सुटका व्हावी म्हणून तात्काळ येथील डीपीची क्षमता वाढऊन देऊन या ठिकाणी ६३ चा डीपी बसविण्यात यावा अशी मागणी शिवसेना तालुका संघटक संजय मल्लू काईतवाड यांनी केली आहे.