नांदेड| नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे माजी खासदार मा. श्री. डॉ. व्यंकटेश काब्दे यांचा ८२ वा वाढदिवस दि. ४ नोव्हेंबर २०२२, रविवार रोजी सायंकाळी ठिक ७ वाजता सावित्रीबाई जोतीबाराव फुले पूर्णाकृती पुतळा आयटीआय चौक, नांदेड येथे आरक्षण हक्क संवर्धन समिती, ओबीसी जागर अभियान नांदेडच्यावतीने संयुक्तीकरित्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बहुजन नेते मा. श्री. श्याम निलंगेकर, आदिवासी मन्नेरवारलू समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. दत्तात्रय अन्नमवाड, ओबीसीचे नेते तथा कायदेतज्ञ ऍड. मा. श्री. प्रशांत कोकणे, वंचित बहुजन आघाडीचे मा.श्री. यशवंत थोरात, ऍड. काकासाहेब डावरे, मा.श्री. प्रकाश सोंडारे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड, पत्रकार मा.श्री. साहेबराव गजभारे, शिक्षक चंद्रकांत रोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मा.श्री. मा.खा. डॉ. व्यंकटेश काब्दे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. कुंजम्मा व्यंकटेश काब्दे यांचा वाढदिवसानिमित्त पुष्पहाराने हृदय सत्कार करुन पेढा भरवण्यात आला व त्यांच्या प्रदीर्घ आयुष्यासाठी व निरोगी आरोग्यासाठी शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी वरील सर्व उपस्थित मान्यवरांनी शब्दरुपी शुभेच्छा मनोगत व्यक्त केले.
यानंतर मा.डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, आज या ठिकाणी आदर्शवत महापुरुष जोतीबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ माझ्या वाढदिवसानिमित्त सत्कार होतोय, याचा मला मनःस्वी आनंद झाला असून भविष्यात देशासाठी व सर्व समाजासाठी महापुरुषांच्या विचाराने आपण सर्वांनीच कार्य करण्याची काळाची गरज आहे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार मा.श्री. दत्तात्रय अन्नमवाड यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी श्री. जयदीप पैठणे, श्री. संजय राक्षसे, श्री. गंगाधर वन्ने, श्री. धम्मदीप सरोदे, श्री. शेख मुबीन यांच्यासह आदी उपस्थित होते.