हिमायतनगर। मागील आठवडाभरापासून सिरंजनी जिल्हा परिषद गटात व संपूर्ण हिमायतनगर तालुका परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या पाच दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही. सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, संततधार पावसामुळे पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार, तीबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बाबुराव कदम कोहळीकर समर्थक दिनेश राठोड यांनी केले आहे.
यंदा सुरुवातीला पावसाने खंड दिला त्यानंतर जोरदार पावसाची एन्ट्री झाली, त्यामुळे शेतकऱ्यावर अतिवृष्टीचे संकट कोसळले आहे. या कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक नुकसानित आला आहे. यंदा शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे प्रशासनाने करून नुकसानीचा अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवून परिसरातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा. चालू खरीप हंगामामध्ये हिमायतनगर तालुका महसूल मंडळात संततधार पाऊस सुरू आहे.
पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांची नागरिकांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, आधीच खरीप हंगामामध्ये पावसाच उशिरा आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट ओढवले होते. काही शेतकऱ्यांनी तर पदरमोड करून दुबार पेरणी केली होती. मागील आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सध्या पिके चांगल्या स्थितीत होती. परंतु गेल्या पाच दिवसापासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे पिके पिवळी होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
लहान ओढे,नदीकाठच्या शेतातील पिके पुरामुळे वाहून गेली आहेत त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. या संकटातून सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यकता सर्व उपाययोजना करून पुरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी व तसेच यासंदर्भात राज्यसरकारकडे मी, माझे सर्वस्व नेते, शिवसेना मा.जिल्हा प्रमुख तथा हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकनेते, मा. बाबुरावजी कदम कोहळीकर साहेब यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून अतिवृष्टीनेग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे दिनेश राठोड यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले.