नांदेड। हवामान अभ्यासक पंंजाबराव डख यांनी दि 11 जुलै रोजी नवीन हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार महाराष्ट्र राज्यात पुढचे चार दिवस पाऊस राहणार असुन, 15 जुलैपासुन सुर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. दि.11-जुलै, 12-जुलै,13-जुलै,14-जुलै ला मराठवाड्यासह राज्यात सर्वदूर ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे.
महाराष्ट्र राज्याची एकंदरीत परीस्थिती पाहीली तर राज्यात सर्वदुर हा पाऊस पडणार आहे. दि.11-जुलै ते 14-जुलै दरम्यान विदर्भात गडचिरोली, आमरावती, अकोला,बुलढाणा,चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली तसेच मराठवाड्यातील जालना,नांदेड, परभणी या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होनार आहे. त्याचबरोबर मुंबईसह संपुर्ण कोकण किनारपट्टि तसेच मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे,जळगाव, नंदुरबार,नाशीक मध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडनार आहे.
मराठवाड्यातील शेतकर्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, की या पावसाने मराठवाड्याची तहान भागवनारे जायकवाडी धराणात पाणी येण्यास सुरुवात होईल.असे हवामान अभ्यासक पंंजाबराव डख यांनी सांगीतले आहे.