मालेगाव/नांदेड| सिआयटीयु अंतर्गत चालणार्या आशा व गटप्रवर्तक फेडरेशन चा राज्य कमीटी सदस्य पदी देगाव कु येथील सारजा कदम यांची निवड वर्धा येथील 3 र्या राज्य अधिवेशनात करण्यात आली. या वेळी आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या राज्य सचिव काॅ. उज्वला पडलवार यांची उपस्थित होती.
मागील काळात आशा व गटप्रवर्तक यांच्या विविध मागन्यासाठी झालेल्या आंदोलनात सारजा कदम यांनी सक्रीय सहभाग नोंदवला होता. याचीच दखल घेऊन राज्या पातळीवर काम करन्याची संधी उपलब्ध करून देत असल्याचे राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार यांनी वक्तव्य केले.या वेळी संघटनेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत काम करू असे सारजा कदम यांनी सांगितले. या निवडी बद्दल वंदना ताई तिडके , धम्माताई घोडके. अर्चनाताई इंगोले ,द्वारका मुरकुंदे ,आनीता कदम ,प्रतीभा चौरे यांनी अभिनंदन केले.