मराठवाड्यात श्रीमंत असलेली वि.से.स. सोसायटी मा.आ. नागेश पा आष्टीकरांच्या ताब्यात -NNL

सत्ताधारी आ माधवराव पाटील जवळगावकरांना केवळ दोन जागा 


हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव विधानसभा क्षेञांत सर्वात श्रीमंत व कोट्यावधी रुपायाची उलढाल असलेली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक चुरशीची व प्रतिष्ठेची समजली जात होती. अखेर या निवडणुकीत सेनेचे माजी आ नागेश आष्टीकर यांच्या पँनलने दमदार बाजी मारली असून 13 पैकी 11 जागेवर निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. तर विद्यमान सत्ताधारी आ माधवराव पाटील जवळगावकरांना केवळ दोन जागावर समाधान मानावे लागले आहे. याअगोदर हिमायतनगर सेवा सहकारी सोसायटीतही शिवसेनेने बाजी मारल्यामुळे या निवडणूक आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीची रंगीत तालीम मनाली जात आहे. 

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी हदगाव विधानसभा क्षेञात अत्यंत महत्त्वाची मानली जाते तर मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकाची असलेली सोसायटीच्या आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या या निवडणुकीत आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी काही कार्यकर्त्यांवर निवडणूकीची जबाबदारी देऊन मोठा विश्वास टाकला होता. पण ते विश्वासु कार्यकर्ते मतदारांना समजविण्यात कुठं तरी कमी पडले याचाच फायदा शिवसेनेचे माजी आ. नागेश पाटील आष्टीकरांच्या कार्यकर्त्यांनी घेतला. आणि मिळालेल्या संधीच सोन करत शिवसेनेचे माजी आ नागेश पा.आष्टीकर यांनी सर्वसुञ आपल्या हाती ठेवली होती. या निवडणूकीच खास वैशिष्ट्ये आहे ८ मे २०२२ रविवारी रोजी मतदान होऊन रात्री उशिरा निकाल लागला असून, यापुर्वी या सोसायटीवर माजी सेना नागेश पाटील आष्टीकर याच्याच ताब्यात होती हे विशेष आहे.

हदगाव शहरात विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ही शहरातील मध्य भागात असुन, या मार्केट मध्ये या संस्थेचे स्वतंत्र व्यापारी संकुल आहे. या संकुलता सुमारे ५० दुकाने आहेत. असे असताना देखील नुकत्याच संपन्न झालेल्या या निवडणुकीला आ.माधवराव पा. जवळगावकर यांनी गार्भियान घेतल्याच दिसुन येत नाही. हदगाव तालुक्याच्या राजकीय दृष्टिकोनातून पाहीले तर ही सोसायटीची निवडणूक शहराच्याच नव्हे तर तालुक्याच्या राजकीय कलाटणी देणारी आहे. पण या बाबतीत विद्यमान आमदारांनी ही निवडणूक काही कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर सोडली त्यामुळे या बाबतीत त्यांचा अपेक्षाभंग झालेलं आहे.

कारण हदगाव शहरातच सर्वात जास्त या संस्थाचे मतदार आहेत आणि न.पा.च्या विकासाच्या कामात काही सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी अप्रत्यक्ष भेदभावचा गोंधळ केल्याने याचाच फटका या सोसायटीच्या निवडणूकीत बसला. कारण काँग्रेसच्या विद्यमान आ. माधवराव पाटील जवळगावकर यांची मी आणि माझे मोजके कार्यकर्ते अशी प्रतिमा निर्माण झाल्याने शहरातील सर्वसामान्य कार्यकर्ते नागरिक हे दुरविल्या गेले होते. माञ सेनेचे माजी आ नागेश पाटील आष्टीकर यांनी या सोसायटीची निवडणुकीला गार्भियान घेत मतदार असलेल्या शहरात व परिसराच्या गावात डोअर टु डोअर भेट घेतली त्याचा परिणाम ही चांगला झाला. काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्त्यांनी यासाठी पण मेहनत घेतली. मात्र काही कार्यकर्ते आमदार आमुचा राज्याचे बांधकाम तथा नादेड जिल्ह्याचे पालकमंञी आमुचे याच भ्रमात  राहील्याने आतुन शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना गाफील ठेवुन मतदारांची थेट -भेठ करुन हदगाव शहराची व शेतकऱ्यांची श्रीमंत सोसायटी पुन्हा आपल्या ताब्यात ठेवली हे आवर्जून उल्लेखनीय आहे.

या निवडणुकीत काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मुन्ना देशमुख व राजेश्वर तालंगकर या दोन उमेदवाराचा विजय झाले असून, बाकी 11 जागेवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. हदगाव सेवा सहकारी सोसायटी ला हदगाव ,वाटेगाव ,फळी ,उमरी, पिंगळी, डोंगरगाव, कवठा, डोंगरगाव, गोजेगाव, वाकोडा, बेलगव्हाण या दहा गावाचे मतदान होते. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होती या निवडणुकीचा परिणाम आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वातावरण निर्मिती करणार असल्याने ही निवडणूक विद्यमान आमदार जवळगावकर व सेनेचे माजी आ आष्टीकर यांनी प्रतिष्ठेची केली होती. 

हदगाव सेवा सहकारी सोसायटी ला एकूण मतदान 18 68 पैकीकी 12 54 झाले आहे. या निवडणुकीत माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बाजी मारल्याने शिवसैनिकांना मोठा उत्साह बघायला मिळाला. या निवडणुकीत वसंतराव माळोदे यांना मतदान(558) ज्ञानेश्वर जाधव(558) भाऊसाहेब तालंकर (567) प्रकाश देशमुख(555) रामराव देशमुख (537)शफी पटेल(555) रामचंद्र लकड(566)दुर्गा कोल्हे(572) श्रीमती सुमित्रा बाई गोदजे(558) धम्मपाल वाठोरे (529)पंडित घुनर (583)हे उमेदवार शिवसेनेचे पँनल मधुन निवडून आले आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी