हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात लवकरच सीटीस्कॅन व डायलेसिस सुविधा उपलब्ध करणार - आ.माधवराव पाटील जवळगावकर
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील रुग्णांसाठी दवाखान्यासह शक्य तेवढ्या सुविधा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करण्यात आल्या. आजचा ऑक्सिजन प्लांट व रक्त साठवण केंद्रही सुरु झाला. यापुढे रुग्णांची गैरसोय होऊ नये आणि महागडा उपचारापासून सुटका व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन लवकरच सीटीस्कॅन व डायलेसिस सुविधा उपलब्ध करणार असल्याचे प्रतिपादन हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.
ते हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दि.०५ फेब्रुवारी शनिवारी रोजी ऑक्सिजन प्लांट आणि रक्त साठवण केंद्राच्या उदघाटन झाल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी.डी.गायकवाड, डॉ नाईक, कृउबाचे सभापती डॉ.प्रकाश वानखेडे, शहराध्यक्ष संजय माने, माजी कृउबा संचालक, रफिक सेठ, सुभाष शिंदे, प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना जवळगावकर म्हणाले कि, कोविड काळात हिमायतनगरचा नव्हे तर संबंध महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच अनेकदा अपघातात जखमी झाल्यानंतर रुग्णांना प्राथमिक उपचार करून रक्ताची आवश्यकता पडल्यास नांदेड रेफर करावे लागत होते. त्यामुळे अनेक जखमींना वाटेतच प्राण गमवावा लागला होता. हि बाब डॉक्टरांनी लक्षात आणून दिल्यानंतर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून हदगाव पाठोपाठ हिमायतनगर येथील ग्रामीण रूग्नालयात ३० बेडचे ऑक्सिजन प्लॅन्ट आणि रक्त साठवण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
त्यामुळे आगामी काळात अपघातात जखमी झालेल्या कोणत्याही गंभीर असलेल्या रुग्णास हिमायतनगर येथे रक्त साथ राहिला तर रक्त देऊन त्याचा जीव वाचविता येणार आहे. तसेच तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका वाढू नये आणि कोविड झाला म्हणून रुग्ण मृत्यूच्या दारापर्यंत जाण्यापासून वाचविण्यासाठी हिमायतनगर येथेच ऑक्सिजन देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात कॅव्हिडच्या गमाभीर रुग्णांना महागडा उपचार घेण्यासाठी कुठेही जाण्याचं गरज भासणार नाही. मी आमदार असताना येथील ग्रामीण रुग्णालय झाले, येथील पाण्याचा प्रश्न यासह विविध समस्या मार्गी लावण्यात आल्या आहेत. शहर व ग्रामीण भागातील मायबाप जनतेसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्याउपरही जाऊन याच ठिकाणी सीटीस्कॅन व डायलेसिस सुविधा उपलब्ध लवकरच व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
एवढेच नाहीतर अगोदर असलेल्या रुग्णालयाच्या सुविधेत वाढ करण्यासाठी याचा इमारतीवर आणखी ३ कोटी ८० लक्ष रुपयाच्या निधीतून आणखी २० बेडची इमारत बांधकामासाठी निधी डीपीडीसी योजनेतून मंजूर करण्यात आला असल्याने आत आपले रुग्णालय ५० बेड्चे होणार आहे. नागरिकांनी कोरोनावर मात करण्यासाठी लस घ्यावी असे सांगून रुग्णालयातील मागील कामकाजच आढावा घेण्यात आला. यावेळी जवळगावकरांनी शहर व ग्रामीण भागातील उर्वरित लसीकरण पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणेने भर द्यावा. अश्या सूचना करून आत्तापर्यंत रुग्णांना चांगल्याप्रकारे सुविधा दिल्याबद्दल डॉक्टरांचे जवळगावकरांनी अभिनंदन केले. तसेच कोरोना काळात जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचा भारतीय पोलीस महासंघाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अनंता देवकते, परमेश्वर गोपतवाड, आबाराव जोगदंड, शे रहीम सेठ, संतोष शिंदे, सरदार खान, फेरोज कुरेशी, अश्रफ भाई, लक्ष्मीबाई भवरे, बाखी सेठ, पंचफुलाबाई लोने, सुरज दासेवार, अशोक अंगुलवार, हनिफ सर, असद मौलाना, अनिल मादसवार, मनान भाई, सोपान बोंपिलवार, शुद्धोधन हनवते, अनिल नाईक, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयांतर्गत लसीकरणाचा पहिला डोस घेणारे ९२ टक्के तर दुसरा डोस ६२ टक्के नागरिकांनी घेतला आहे. येथे वैद्यकीय अधिष्ठाता पद रिक्त आहे. तसेच रुग्णालयाचे उर्वरित बांधकाम, दुरुस्ती, रिक्त जागा, एक्सरे मशीन, यासह आवश्यक त्या सुविधा आमदार महोदयांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबद्दल आम्ही आभारी आहोत असे म्हणत ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.डी.डी.गायकवाड यांनी आपले मत व्यक्त केले.