आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्ना मुळे क्रिडा संकुलच्या जागेचा प्रश्न मार्गी
हिमायतनगर| गेल्या अनेक वर्षपासून रखडलेल्या हिमायतनगर तालुक्यातील क्रिडा संकुलाच प्रश्न आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नाने मार्गी लागला असुन, तालुक्यातील मौजे घारापुर येथील गायरान मधील गट क्रमांक १६ मधील क्षेत्र ०३ हेकटर २० आर गायरान जमिन देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी दिले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घारापुरच्या गायरान जागेत क्रीडा संकुलसाठी डॉ विपीन यांच्याकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याने तालुकास्तरीय क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
हिमायतनगर येथे तालुका क्रीडा संकुलांसाठी जागाच उपलब्ध होत नव्हती. गेल्या दोन वर्षापासून आ.जवळगावकर यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु केला आहे. तालुका स्तरावर विविध खेळांच्या क्रिडा सुविधा निर्माण करण्याकरिता क्रिडा संकुल होणे गरजेचे होते. गेल्या काही वर्षांपासून जागेअभावी क्रिडा संकुलचा प्रश्न प्रलंबित होता. शासकीय ठिकाणी जागा पाहणी करून देखील अपुऱ्या जागेमुळे आजतागायत संकुल उभारता आले नाही. आ. जवळगावकर यांच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी घारापुर गायरान मध्ये असलेल्या गट क्रमांक- 16 मधील क्षेत्र 03 हेक्टर 20 आर गायरान जमीन तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
हिमायतनगर तालुका हा मुख्य घटक धरून प्रत्येक तालुक्यात एक तालुका क्रिडा संकुल क्रिडा विकासाच्या कायम क्रिडा संकुल सुविधासह उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेस मान्यता दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरासह ग्रामीण भागातील खेळाडूंना क्रिडा संकुल नसल्यामुळे हेळसांड होत होती. तालुक्यातील खेळाडूंची मागणी लक्षात घेऊन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी सदरील क्रिडा संकुलसाठी जागा पाहणी केली होती. त्याच जागेची निवड शासनाकडून करण्यात आली आहे. घारापुर येथील ९ एकरातील गायरान जागेवर भव्य तालुका क्रिडा संकुल उभारण्यात येणार आहे.
जागा मिळाली क्रिडा संकुलही उभे करू..आ.जवळगावकर
तालुका क्रिडा संकुलसाठी जागाच नसल्यामुळे आजतागायत संकुल झाले नाही घारापुर येथील गायरान जागा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असून, जागेचा प्रश्न सुटला आहे. लवकरच ५ कोटीच्या निधीतून क्रिडा संकुल इमारत उभारू यासाठी शासन स्तरावर निधीची मागणी करणार असल्याचे आ. जवळगावकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना सांगितले.