NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

बुधवार, 29 अप्रैल 2015

शुद्ध पेयजल प्लांटच्या उद्घाटन

श्रीक्षेत्र परमेश्वर मंदिर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही....आ.नागेश आष्टीकर 

हिमायतनगर(वार्ताहर)जाज्वल देवस्थानच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा वाढवून मंदिर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणणार असल्याचे प्रतिपादन हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी केले. ते हिमायतनगर परमेश्वर मंदिराच्या वतीने भाविक भक्त व शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्ठीने बसविण्यात आलेल्या शुद्ध पेयजल प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी प्रथम बसविण्यात आलेल्या प्लांटची पाहणी व पूजन करून व फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने आ.आष्टीकर यांच्या उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी शाल - श्रीफळ देवून सत्कार केला. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, परमेश्वर मंदिर कमेटीने आजवर राबविण्यात आलेले सर्व उपक्रम प्रशंसनीय आहेत. त्यातून मंदिराचा विकास व सामाजिक बांधिलकी जोपासली गेली आहे. दर्शन व मंदिरात विसाव्यासाठी येणार्यांना दुषित पाण्याच्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शुद्ध पेयजल योजना कार्यान्वित केली. मंदिराच्या वतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम अतिशय गरजेचा होता. शासनही असे उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्या माध्यमातून पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या सोयीसाठी चौकात चौकात फिल्टरचे प्लांट बसविण्याच्या तयारीत आहे. याच  बरोबर मंदिर संचालकांनी सुचविल्याप्रमाणे मंदिरासह शहराच्या विकासासाठी मी कटीबद्ध असून, यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासनही त्यांनी दिले.


दरम्यान मंदिराचे उपाध्यक्ष श्रीश्रीमाळ यांनी सांगितले की, नांदेड - किनवट रस्त्यावर तहसील शेजारी असलेल्या मंदिराच्या १५ एकर जागेत शुशोभित व नैसर्गिक असे भव्य उद्यान व्हावे. जेणेकरून  शहरातील वयोवृद्ध, बालके, व सहकुटुंब नागरिकांना फिरण्यासाठी तथा विरंगुळ्यासाठी रम्य ठिकाण उपलब्ध होऊन शहरच्या वैभवात भर पडेल. यासाठी शासनाकडे पाठ पुरावा करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. त्यांच्या मागणीला दुजोरा देत आमदारांनी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी मंदिर समितीचे सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, संचालक लक्ष्मण शक्करगे, संभाजी जाधव, राजाराम झरेवाड, प्रकाश शिंदे, वामनराव बनसोडे, अनंता देवकते, माधव पाळजकर, स्वीय्य सहाय्यक बंडू पाटील आष्टीकर, हदगाव - हिमायतनगर विधानसभा संघटक विजय वळसे, शिवसेना तालुका रामभाऊ ठाकरे, महिला आघाडी प्रमुख चंद्रकला गुड्डेटवार, ज्ञानेश्वर शिंदे, परमेश्वर इंगळे, जफरभाई, किशनराव वानखेडे, रामराव पाटील, शंकर पाटील, गणेश कदम, परमेश्वर पानपट्टे, संजय काईतवाड, विशाल राठोड, राम नरवाडे, रमेश गुड्डेटवार, गजानन पाळजकर, प्रकाश रामदिनवार, विलास वानखडे, गजानन वानखेडे, गजानन हरडपकर, हानुसिंग ठाकूर, दिलीप शिंदे, नांदेड न्युज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार, परमेश्वर शिंदे, धम्मपाल मुनेश्वर, यांच्यासह शिवसैनिक कार्यकर्ते, गावकरी, पत्रकार, मंदिराचे कर्मचारी उपस्थित होते. 

रविवार, 26 अप्रैल 2015

२.५ लाखाच्या गुटखासह जप्त

उपविभागीय अधिकार्याच्या धाडीत २.५ लाखाच्या गुटखासह अल्टो कार जप्त.....


हिमायतनगर(अनिल मादसवार) गुटख्याची अवैद्यरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने घरात माल साठवून ठेवल्याच्या माहितीवरून शनिवारी सायंकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी योगेश कुमार यांनी छापा मारून २ लाख ५३ हजारचा गुटखा व अल्टो कार जप्त केली आहे. अन्न औषध प्रशासनाच्या पंचनाम्यानंतर दुसर्या दिवशी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शहरातील काही जणांकडून गुटख्याची खुलेआम गुटख्याची विक्री केली जात असल्याची खबर कोण्यातरी खबर्याने भोकरचे पोलिस उपविभागीय अधिकारी योगेश कुमार यांना दिली होती. त्यावरून दि.२५ शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हिमायतनगर शहरातील रहिम कॉलनी येथील विहिरीजवळ असलेल्या एका घरावर ए.पी.आय.आरदवाड, एन.पी.सी. बिडकर, पो.को.डी. एम. सावंत यांच्यासह हिमायतनगर येथील पी.एस.आय.शेट्टे मैडम, स.पो.नि.सुशील चव्हाण, पो.को. एन. एम.कोठुळे, वसंत चव्हाण, आदींनि छापा मारला. यावेळी घरात आर.एम.डी., बाबा रत्ना, विमल, सितार, गोवा, आर.के.,सिल्वर कलर टोबैको, पान पराग, रजनीगंधा आदीसह अन्य प्रकारचे पान मसाले व गुटख्याचा अवैद्य रित्या काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे आढळून आले. दरम्यान माल साठवून ठेवणाऱ्या स.जुबेर, स.आमेर, स.खमर या तिघांना पोलिसी खाक्या दाखवत जेरबंद केले आहे. तर यांच्याकडून माल खरेदी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथून आलेली अल्टो कार क्रमांक एम.एच.२२ - डी.१८३८ आणि प्रकाशराव दत्तराव लोमटे रा.चुंचा व अमोल प्रकाशराव लोमटे चुंचा या दोघांना असे मिळून पाच जणांवर कलम २६, २२, २(१),(आई/व्ही.)२७, ३, आणणा औषधी १८८,२७३,३२८,३४ - ७ भादवी अनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. 

दुसर्या दिवशी अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी स.वि.कनकावार यांनी जप्त मालाचा पंचनामा करून या बाबतची फिर्याद दिल्यावरून हिमायतनगर पोलिस डायरीत गुटखा व सुगंधी पान मसाले यावर शासनाने बंदी घातलेली असताना २ लाख ५३ हजारचा माल बाळगून मिळून आले असल्याने अन्न औषध प्रशासनाच्या नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाहीने अविद्या धन्देवाल्यात खळबळ उडाली आहे.

शुक्रवार, 24 अप्रैल 2015

जनावराच्या डॉक्टरच्या विरोधात पशुपालक - शेतकऱ्यांचा उद्रेक

मनमानी कारभाराला कंटाळून पशुवैद्यकीय दवाखान्याला लावले कुलूप 

हिमायतनगर(वार्ताहर)गेल्या काही महिन्यापासून येथील जनावराच्या डॉक्टरने पशु पालकांसोबत  जनावरासारखेच वागणे सुरु करून मनमानी कारभार चालविला आहे. वाट्टेल तेंव्हा दवाखाना बंद करून लसीकरणाच्या नावाखाली अनुपस्थित राहण्याच्या कारभाराला शेतकरी व पशु पालक वैतागले आहेत. दि.२४ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ११.३० पर्यंत थांबूनही डॉक्टरसह कर्मचारी आले नसल्याने संतप्त शेतकर्यांनी उद्रेक करत दवाखान्यास कुलूप लावून तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, येथील पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालयात गत काही वर्षापासून पशुवैद्यकीय अधिकारी श्री बिरादार यांनी मनमानी कारभार सुरु केला आहे. रुग्णालय उघडण्याची वेळ ठरवून दिली असताना वेळेवर न उघडणे, बुधवारी आठवडी बाजारच्या दिवशी दुपारच्या ठराविक वेळेच्या अगोदर गेट बंद करून ठेवणे, विचारपूस करणार्यास व जनावरे घेवून येणार्यास ताटकळत ठेवणे, उपचारासाठी आलेल्या रुग्णांना औषधी बाहेरून आणावयास लावणे, शासकीय योजनांची माहिती शेतकरी व पशुपालकांना न देणे, विचारणाऱ्या शेतकर्यांना उडवा - उडवीची उत्तरे देवून कामचुकारपणा करणे, स्थानिकला राहत असल्याचे भासवून भोकर येथून ये - जा करणे यामुळे पशुपालक व शेतकर्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला तर काहीना आपली जनावरे गमवावी लागली आहेत. असे अनेक प्रकार मागील काळात घडले असून, जखमी जनावरांसह वन्य प्राण्यांना तासंतास विव्हळावे लागले तर परमेश्वर मंदिराचा लाखो रुपये किमतीचा कठाळ्याला विव्हळत प्राण गमवावे लागल्याचे उजेडात आले आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारीवरून अनेक वर्तमान पत्रातून बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्या आहेत. परंतु वरिष्ठ अधिकारी अश्या कामचुकार डॉक्टरास अभय देत असल्याने मनमानी कारभाराची सीमा पार केली आहे. असाच काहींसा प्रकार दि.२४ शुक्रवारी पुन्हा एकदा घडला असून, सकाळी ७ वाजता हिमायतनगर शहरासह तालुक्यातील सिरंजणी, एकघरी, पवना, खडकी बा., घारापुर, पळसपूर, पिछोंडी आदीसह अनेक गावातील पशुपालाकानी आपली जनावरे त्यात गायी, गोऱ्हे, शेळ्या, कुत्रे, बैल, म्हैस आदीसह अनेक मुक्या पशूना उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले होते. परंतु नेहमी प्रमाणे लसीकरणाच्या नावाखाली स्वतः पशुवैद्यकीय अधिकारी श्री बिरादार हे स्वतः तर अनुपस्थित होतेच तर या ठिकाणी कार्यरत अन्य कर्मचारी सुद्धा गैरहजर दिसून आले. त्यामुळे शेतकर्यांनी तब्बल ४ तास वाट पाहून अखेर जनावरे विव्हळत असल्याने पत्रकारांना बोलावून असुविदेच्या गर्तेत सापडलेल्या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या मनमानी कारभाराची पोलखोल केली. यावेळी अनेकांनी संबंधित डॉक्टरास दूरध्वनीवरून विचारणा केली असता, आमचे लसीकरणाचे काम सुरु आहे असे सांगून हात झटकण्याचा प्रयत केला. त्यामुळे संतप्त पशु पालकानी रुग्णालयास कुलूप लावून मनमानी कारभाराचा तीव्र शब्दात निषेध केला. जोपर्यंत डॉक्टर उपस्थित होणार नाहीती तोपर्यंत कुलूप काढणार नाही असा पवित्र घेतला होता. तब्बल ११ .४५ वाजता रुग्णालयात कर्मचारी दाखल झाले, सकाळपासून तळपत्या उन्हात पाण्यावाचून विव्हळणाऱ्या जनावराना तातडीने उपचार मिळावा म्हणून पशु पालकांनी लावलेले कुलूप काढून उपचार करवून घेतला. यावेळी उपस्थित दत्ता दंडेवाड, शिवदर्शन गड्डमवार सिरंजणी, दत्ता टारपे पिछोंडी, श्याम म्याकलवाड सिरंजणी, बळीराम फुलके हिमायतनगर, मारोती राऊलवाड पवना, विश्वनाथ कळले खडकी बा, बाबुराव कत्तुलवाड, पापा दंडेवाड, सलाम अब्दुल कुरेशी हिमायतनगर यांच्यासह अनेक गावचे पशुपालकांनी संबंधित डॉक्टरची  उचलबांगडी करून कर्तव्यदक्ष अधिकार्याची नेमणूक करण्याची मागणी केली आहे.  

याबाबत दत्ता दंडेवाड म्हणाले कि, येथे शासनाकडून औषधी पुरवठा होत असला तरी डॉक्टरच्या नियोजनशून्य कारभारामुळे काही औषधी कालबाह्य झाली असून, रुग्णालयात ठेवली आहे. काही महागडी औषधी आपल्या मर्जीतील मेडिकल स्टोर्स मध्ये ठेवून पशुपालकांना औषधी नसल्याचे सांगून विकत अनन्यास भाग पडत असल्याचे बोलून दाखविले. 

याबाबत पशुधन विकास अधिकारी श्री बिरादार यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, मला लसीकरणाचे टार्गेट दिले आहे. त्या निमित्ताने मी नांदेडला गेलो आहे. कर्मचारी बाहेर गावात  लसिकारणाला गेले आहेत, आजच्या प्रकारामुळे मी यानंतर लसीकरण करणार नाही असे वरिष्ठांना सांगितल्याचे ते म्हणाले.  असे असले तरी थोड्या वेळाने ते हिमायतनगर शहरात फिरताना दिसून आल्याने त्यांच्या कामाचुकार पणाचा पुन्हा एकदा पशु पालकांना अनुभव आला.   

याबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री गोहोत्रे यांच्याशी दोन वेळा दूरध्वनीवरून ११.४४ वाजता संपर्क केला असता आय कॉल यु लेटर अश्या प्रकारचा मेसेज पाठविला. दुसर्यांदा १.२८ मिनिटानी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही. यावरून वरिष्ठ अधिकारी कामचुकार डॉक्टरास अभय देत असल्याच्या प्रकाराला दुजोरा मिळत आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.  

रविवार, 19 अप्रैल 2015

साखरपुड्यात शुभविवाह

मुलगी पहायला आले आणि लग्न लावून नेले...


हिमायतनगर(अनिल मादसवार)
महागाई, व खर्चाच्या प्रथेला बाजूला सारत तालुक्यातील मौजे सिरंजणी येथे दि.१९ रविवारी एका नवदाम्पत्याचा साखरपुड्यात शुभविवाह संपन्न झाला आहे. या लग्न सोहळ्याचे अनुकरण सर्वांनी करणे काळाची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त करीत वधू - वरास शुभेच्छा दिल्या आहेत.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, इस्लापूर नजीकच्या इरेगाव येथील कु.गंगासागर विठ्ठल पेंटेवाड हिच्या सोयरीकीची जबाबदारी सिरंजणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव उप्पलवाड यांच्याकडे त्यांच्या बहिणीने सोपविली होती. परिस्थिती गरीब असल्याने मामाने भोकर तालुक्यातील नांदा येथील युवक नरसिंगु भोजन्ना कुंटलवाड यांची निवड केली होती. ठरल्याप्रमाणे दि.१९ रविवारी सिरंजणी येथे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने वरपक्षाकडील नातेवाईक व वधू पक्षाकडील नातेवाईक सकाळी १० वाजता एकत्र जमले. चहा - फराळाने     मुलगी पाहण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. मुलाने मुलीस पसंती दर्शविल्याने लगेच साखरपुडा टिळा लावण्याचे ठरविले. त्यासाठी टेंट, बैण्डबाजा, जेवणा बरोबर अन्य साहित्य जुळविण्याची लगबग मुलीच्या मामाने सुरु केली होती.


दरम्यान गरीब कुटुंबातील मुलीच्या साखरपुड्यासाठी मामाकडून केला जाणारा सर्व खटाटोप पाहता, वरपित्याने नवरदेव व नातेवाईकांशी चर्चा करून साखरपुड्यात शुभमंगल लावण्याचा प्रस्ताव ठेवला. वाढती महागाई, नातेवाईकांची सोय, वाहने, वेळ यावर होणारा सर्व खर्चाचा ताळमेळ पाहता वधू पक्षाच्या लोकांनी सुद्धा यास दुजोरा दिला. आणि काही तासातच रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास पुरोहिताला पाचारण करून साखरपुड्याच्या कार्यक्रमात शुभमंगल सावधान करण्यात आले. अत्यंत साध्या पद्धतीने नवदाम्पत्य एक दुसर्याच्या गळ्यात माळा घालून विवाह बंधनात बांधल्या गेलेत. या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित झालेले माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर, जी.प.सदस्य सुभाष राठोड, जनार्धन ताडेवाड, बाबुराव बोड्डेवार, विकास पाटील, गणेश शिंदे, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते नारायण करेवाड, यांच्यासह अनेकांनी नव वधू - वरास नांदा सौख्यभराच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

कृषी विभागाचा उद्देश संशयाच्या भोवर्यात

शेकडो तक्रारी नंतरही पाणलोट कार्यक्रमाला गती..
कृषी विभागाचा उद्देश संशयाच्या भोवर्यात 

हिमायतनगर(अनिल मादसवार)
कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी व उपोषणे झाली. त्यानंतरही पाणलोटाची कामे घाई घाईने उरकण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामागे कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उद्देश काय..? असा संशय नागरीकामध्ये निर्माण होत आहे. 

सविस्तर असे कि, राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत गावासह शेती व शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्दात हेतूने राज्य शासनाने प्रत्येकी गावास कोटीच्या जवळपास निधी उपलब्ध करून दिला आहे. आणि पाणलोट अभियान पारदर्शी राबविण्याच्या सूचना शासन निर्णयानुसार दिले असले तरी लोण्याच्या गोळ्यावर डोळा ठेवून कृषी विभागातील अधिकार्यांनी नागरिकांना पाणलोट अभियानाची जुजबी माहिती देत एकाला चलो रे कार्यक्रम हाती घेतला आहे. खरे पाहता एका ठिकाणी तीन वर्ष एकच अधिकारी राहू नये असे असता देखील गत अनेक वर्षापासून याच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या काहींनी मनमानी कारभारच चालूच ठेवला आहे. यामुळेच कि काय गत वर्षी राबविण्यात आलेल्या गावात पाणलोटाच्या विविध विकास कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची ओरड अनेक गावातील नागरीकाकडून झाली. कित्येकांनी चौकशी करून अनेक वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या कृषी विभागातील कृषी सहाय्यक, सुपरवायजर व कृषी अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी तहसील कार्यालयासमोर उपोषण मांडून केली. परंतु तत्कालीन अकार्यक्षम लोकप्रतिनिधी आणि मैनेजमेंट मध्ये तरबेज असलेल्या कृषी विभागाच्या सुपरवायजरणे कोणतेही बिंग फुटू दिले नाही. याविषयी कृषी विभागाशी संपर्क साधून अनेक वेळा माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु कृषी विभागातील अधिकारी ताकास तूप लागू देत नसल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे. सिंचनाचा स्त्रोत वाढविण्यासाठी शेती सपाटीकरण, नाला सरळीकरण, पाण्याचा स्तर वाढविण्यासाठी चर टाकणे व बांधणे, आदीसह अनेक कामे करण्यात येत आहेत. मात्र कृषी विभागातील अधिकारीच पाणलोट अभियानाच्या उद्देशाला कात्री लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रत्येकी शेतकऱ्याच्या शेतात ५० ते ६० हजाराचा खर्च दाखवून शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचे काम कृषी सहाय्यक सुपर वायजर व कृषीअधिकार्यांनी केले आणि अजूनही करत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. त्यामुळेच कि काय तालुक्यातील टेंभी परिसरात नव्याने चालू केलेल्या कामात थातूर - माथुर पद्धतीने जुन्याचा कट्ट्यावर कट्टे टाकले जात आहेत. तर नाल्याची खोली अंदाजपत्रका प्रमाणे न करता शासनाचा निधी गिळंकृत करण्याचा प्रकार यंदाच्या पाणलोट कामात केला जात असल्याचे प्रत्यक्ष दर्शी दिसून येत आहे. हा सर्व प्रकार कृषी सहाय्यक सुपर वायजर व कृषी अधिकारी यांच्या संगनमताने केला जात असून, त्यांच्या संपत्तीची चौकशी केल्यास भ्रष्टाचारातून माया जमविल्याचे उघड होईल..? असा सूर नागरीकातून उमटत आहे.  


शनिवार, 18 अप्रैल 2015

विद्यार्थ्यांना जुंपले कामावर

सिरंजणीच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना जुंपले कामावर


सिरंजणी(धम्मपाल मुनेश्वर) तालुक्यातील मौजे सिरंजणी जी.प.शाळेत शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना बांधकामावर पाणी मारण्यासारखे काम लावून संबंधिताकडून जीव धोक्यात टाकला जात असल्याची तक्रार गावातील युवकांनी वरिष्ठाकडे केली आहे. 

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजणी येथील जी.प.शाळेत पहिली ते सातवी पर्यंत शाळा आहे. सध्या या शाळेत मुलींच्या शौच्चालयासाठी सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत एकाहत्तर हजार दोनशे पन्नास रुपयाचा शासकीय निधी प्राप्त झाला आहे. सदरचे बांधकाम हे शाळेचे मुख्याध्यापक करीत असून, या कामात नाल्याची मातीमिश्रित रेती, कमी प्रमाणात सिमेंटचा वापर करून शौच्चालयाचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केले जात आहे. एवढेच नव्हे तर शासनाच्या निधीवर डल्ला मारण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना कामाला जुंपले आहे. या कामात विद्यार्थ्यांना धोका होण्याची शक्यता आहे. कारण पाणी मारण्यासाठी लोखंडी गजाच्या रिंग लावलेल्या पिल्लरवरून भिंतीवर जावे लागत आहे. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत आहे. खरे पाहता शेली जीवनात शिक्षांचे धडे देण्याचे सोडून मुख्याध्यापकाकडून असे काम करवून घेतले जात असल्याने गावकरी नागरीकातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे, गटशिक्षण अधिकारी सुरजुसे यांनी लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्या त्या संबंधित मुख्याध्यापकावर कार्यवाही करावी अशी मागणी येथील युवक पवन करेवाड यांच्यासह अनेकांनी केली आहे. या अगोदर शालेय व्यवस्थापन निवडीत मुख्याध्यापकाने मनमानी कारभार केला होता त्या तक्रारीवरून शाळेची चौकशी करण्यात आली. परंतु याबाबत काय कार्यवाही केली याची माहिती शिक्षण विभागाचे अधिकारी न देता संबंधित मुख्याध्यापकाला अभय देत आहेत असेही श्री करेवाड यांनी सांगितले. 

याबाबत विद्यार्थ्याचे पालक नारायण पेटपल्लेवार यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, आम्ही मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेत सकाळी ७ वाजता पाठवितो. मात्र मास्तर शाळेत त्याला काम लावत असल्याचे समजले. त्या मास्तरला आमच्या मुलाला काम लावायचा काय अधिकार असा सवाल तानी उपस्थित केला. 

या बाबत मुख्याध्यापकास विचारण केली असता ते म्हणाले, मी नसताना मुलाचं फोटो काढल्या गेले, मी याबद्दल काहीच सांगत नाही असे म्हणून हात झटकण्याचा प्रयत्न केला. यावरून संबंधित मुख्याध्यापकास शाळेवर अनुपस्थित राहतात काय..? असा सवाल पुढे येत आहे. 


या बाबत गटशिक्षण अधिकारी सुरजुसे यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले कि, मी बाहेर दौर्यावर आहे, आल्यानंतर तक्रारीवर चौकशी करून योग्य ती कार्यवाही करेल.

धबधबा वाहू लागला

अन अवकाळी पावसाने...
चक्क उन्हाळ्यात धबधबा वाहू लागला


 हिमायतनगर(अनिल मादसवार) विदर्भ- मराठवाड्यात सीमेवरून वाहणारा पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा दि.१४, १५ रोजी झालेल्या दामदार अवकाळी पावसाने चक्क उन्हाळ्यात सळसळ वाहू लागला आहे. हि बातमी समजताच पर्यटकांना समजताच अनेकांनी सहस्रकुंडची वाट धरली आहे. 

नांदेड - किनवट राज्यरस्त्यावरील इस्लापूर पासून ४ कि.मी.अंतरावर असलेला सहस्रकुंड धबधब्याचे मनोहारी दृश्य प्रती वर्षी पावसाळ्यात पहावयास मिळते. परंतु यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये झालेल्या अल्प पावसाने धबधब्याचे दृश्य पर्यटकांना पाहण्यासाठी वाट पहावी लागली होती. उशिरा का होईना...धबधबा सुरु झाल्याचे समजताच पर्यटकांची गर्दी उसळली. परंतु मोजक्याच काही दिवसात धबधबा कोरडा पडल्याने दूरवरून येणाऱ्या अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला होता. त्यानंतर तब्बल सहा महिन्यानंतर एप्रिल मध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या हजेरीने धबधब्याच्या दोन्ही धारा थोड्या प्रमाणातच का होईना सळसळ वाहू लागल्या. दि.१५ रोजी झालेल्या दमदार पावसाने इस्लापूर व हिमायतनगर भागातील नाले भरून वाहू लागले. या ओढ्याचे पाणी नदीत मिसळून वाहिल्याने हा धबधबा सुरू झाल्याचे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दि.१८ सकाळपासून कडक उन पडल्याने नुकत्याच सुरु झालेल्या धबधब्याचे दृश्य किती पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडेल हे सांगणे कठीण आहे. एकूणच भर उन्हाळ्याच्या दिवसात धबधबा वाहतानाचे दृश्य दिसत असल्याने पर्यटकांचा वाटा सहस्रकुंडकडे वळल्याचे चित्र दिसत आहे.

शनिवार, 4 अप्रैल 2015

वै‍कल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

वैकल्पिक वाद निवारण पुढारलेल्या  समाजाचे लक्षण - न्या . सुनिल देशमुख 


नांदेड(प्रतिनिधी)वैकल्पिक वाद निवारण हे पुढारलेल्या समाजाचे लक्षण आहे. त्यामुळे नव्या इमारतीच्या सुविधेमुळे नांदेड विधी सेवा प्राधिकरण वैकल्पिक वाद निवारणाच्या कामात यापुढे आणखी आघाडी घेईल असे प्रतिपादन मुंबई उच्च  न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुनिल देशमुख यांनी आज येथे केले. येथील न्याय संकुलाच्या प्रांगणातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वै‍कल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन न्या. देशमुख यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्या‍याधीश द. उ. मुल्लाक होते. व्यासपीठावर जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड विजयकुमार भोपी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. नेरे उपस्थित होते. न्या्. एस. आर. पवार, न्या. मस्के, जिल्हा सरकारी वकील अॅड बालाजी शिंदे, अॅड राजकुमार शुरकांबळे आदींसह विधीज्ज्ञ, न्यायीक अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलतांना न्या . देशमुख म्हणाले की, वैकल्पिक वाद निवारण पाश्चात्य देशात चांगल्या पद्धतीने रुजू लागली आहे. या वैकल्पिक वाद निवारण पद्धतीतून या पुढारलेल्या देशांच्या  संस्कृंतिचे पुढारलेपण दिसून येऊ लागले आहे. त्या देशातील समाजाला भांडण तंट्यातील वितृष्टाता, निष्फळता लक्षात आली आहे. सामाजिक प्रगल्भताही लक्षात येऊ लागली आहे. नांदेडच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणानेही वैकल्पिक वाद निवारणात उत्कृष्ट काम केले आहे. या नव्या इमारतीमुळे विधीज्ज्ञ आणि पक्षकारांना चांगल्या सुविधा देता येतील त्यामुळे वैकल्पिक वाद निवारण प्रक्रियेत आणखी गती येईल. त्यामुळे या कामात नांदेड विधी सेवा प्राधिकरण आणखी आघाडी घेईल अशी अपेक्षा आहे. 

प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. मुल्ला म्हणाले की, या इमारतीत होणारे काम काही कुटुंबांना लागलेले तंटे वादाचे ग्रहण दूर करेल अशी अपेक्षा आहे. तंटे-वादाच्या या ग्रहणातून अनेक कुटुंबांची सुटका करण्यासाठी विधीज्ज्ञ मंडळीनी प्रयत्न करावेत. आपल्या पक्षकाराबरोबर संवाद साधावा. यामुळे त्यांचा न्याय प्रक्रियेवरही विश्वास दृढ होईल. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. नेरे प्रास्ताविकात म्हणाले की, वैकल्पिक वाद निवारण प्रक्रियेत दोन्ही बाजुच्या पक्षकारांचा तडजोडीमुळे समसमान विजय होतो. त्यामुळे विधीतज्ज्ञ व पक्षकारांनी प्रलंबीत असे खटले, प्रकरणे निकालात काढण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. यापुर्वीही नांदेड जिल्ह्याचे उत्कृष्ट काम केले आहे. हे काम आणखी चांगल्या रितीने पुढे नेण्यासाठी केंद्राची ही नवी इमारत उपयुक्त ठरेल. 

सुरुवातीला केंद्राच्या नूतन इमारतीचे नामफलकाच्या अनावरणाने व फित कापून उद्घाटन झाले. इमारतीतील संवाद, मध्यस्थ कक्ष व अनुषंगीक सोई सुविधांची मान्यवरांनी पाहणी केली. दीप प्रज्वलाने उद्घाटन सोहळ्यास प्रारंभ झाला. बांधकाम विभागाचे अभियंता गुणवंतराव भांगे यांचा न्या. देशमुख यांच्या हस्ते सत्कार झाला. अभिवक्ता संघाचे अध्य क्ष श्री. भोपी यांचे समयोचित भाषण झाले. अॅड गजानन पिंपरखेडे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य न्याय दंडाधिकारी ए. बी. भस्मे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पक्षकार, नागरीक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

स्‍वच्‍छतेविषयी जिल्‍हयात जनजागृती

युनिसेफच्‍या संवाद साहित्‍याने...स्‍वच्‍छते विषयी जिल्‍हयात करण्‍यात येणार जनजागृती

नांदेड(प्रतिनिधी)नांदेड जिल्‍हयाने शौचालय बांधकामामध्‍ये राज्‍यात सर्वाधिक शौचालय बांधुन विक्रम केला आहे. त्‍यामुळे चालु आर्थिक वर्षात 85 हजार शौचालयाचे उदिष्‍ट राज्‍य शासनाने दिले आहे.

शौचालयाचे 85 हजाराचे उदिष्‍ट साध्‍य करण्‍यासाठी गावस्‍तरावर नागरिकांची मानसिकता बदलण्‍यासाठी माहिती, शिक्षण व संवादाचे विविध उपक्रम राबविण्‍यात येणार आहेत, अशी माहिती पाणी व स्‍वच्‍छता विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल. रामोड यांनी दिली आहे. स्‍वच्‍छताक्षेत्रात लोकांची मानसिकता बदलण्‍यासाठी युनिसेफ मार्फत विविध माहिती शिक्षण व संवादाचे टुल्स तयार करण्‍यात आले आहेत. याव्‍दारे महिला बचतगट, शाळेतील विद्यार्थी, युवक व युवती मंडळ, ग्राम पंचायतीचे सदस्‍य, गावस्‍तरावरील विविध समित्‍या आदींसाठी या संवाद साहित्‍यांचा वापर करण्‍यात येणार आहे.

युनिसेफ यांनी तयार केलेल्‍या संवाद साहित्‍याची हाताळणी कशी करावी, त्‍यांचा वापर कसा करावा यासंर्भात जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशनचे जिल्‍हा कार्यक्रम व्‍यवस्‍थापक मिलिंद व्‍यवहारे यांनी तालुकास्‍तरीय गट समन्‍वयक व समुह समन्‍वयक यांचे प्रशिक्षण घेऊन त्‍यांना माहिती दिली आहे. पाणी व स्‍वच्‍छतेविषयी भाषण किंवा संवादाच्‍या माध्‍यमाने गावक-यांना स्‍वच्‍छतेची माहिती देतांना युनिसेफच्‍या वतीने तयार करण्‍यात आलेल्‍या संवाद साहित्‍याचा उपयोग करण्‍यात येणार आहे. यात प्रत्‍यक्ष लाभार्थींना स्‍वच्‍छतेविषयी माहिती देण्‍यात येणार आहे. युनिसेफच्‍या संवाद साहित्‍याची एक किट सर्व तालुक्‍यांना देण्‍यात येणार आहे.


युनिसेफच्‍या संवाद साहित्‍य टूल्समध्‍ये हात धुण्‍याच्‍या पध्‍दती, शुध्‍द पाण्‍याचे महत्‍व, गाव कृती आराखडा, स्‍वच्‍छ व सुंदर गाव, दुषित वातावरणामुळे पसरणारे आजार व त्‍यावरील उपाय, उघडयावरील हागणरीमुळे होणारे दुष्‍परिणाम, डायरियावर (अतिसार) घरच्‍या घरी उपचार, फ्फिप चार्टवरुन स्‍वच्‍छतेविषयी ग्रामस्‍थांनासाठी चित्र विषयक कथा सांगणे अशा आकरा संवाद टूल्‍सचा यात समावेश आहे. विशेषतः महिला बचतगट, शालेय विद्यार्थी, युवक-युवती यांच्‍या छोटया ग्रुपमध्‍ये या माध्‍यमांचा चांगला प्रभाव पडेल, असे मत जी.एल.रामोड यांनी व्‍यक्‍त केले आहे. 

हनुमान जयंतीच्या पुर्वसंध्येला रंगली भजनसंध्या

अहंकार बळ आणि बुद्धीच्या विकासातील अडथळा 
नांदेड(अनिल मादसवार)रामभक्त हनुमान हे बळ, बुद्धी आणि ब्रह्मचार्याबाबत आपल्या आध्यात्मिक इतिहासात प्रचलीत आहेत. अवघ्या डोंगराला उचलण्याचे सामर्थ असलेला आणि रावणासारख्या बुद्धीमान राजालाही आपल्या बुद्धीचातुर्याच्या बळावर नामोहरम करणारा हनुमान श्रीरामासमोर मात्र नतमस्तक होतो. कारण हनुमानामध्ये आपल्या बुद्धीचा आणि बळाचा कोणताही अहंकार नव्हता, अशी हनुमान महती प्रसिद्ध गायक सरदार लख्खासिंग यांनी आपल्या भजनसंध्या कार्यक्रमात व्यक्त केली.

येथील सालासर भजन मंडळाच्या वतीने मागील दहा दिवसांपासून श्रीराम चरित्र आणि भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात रामभक्त हनुमानाची महती गाताना सरदार लख्खासिंग बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रामेश्वर तिवारी, दडू पुरोहित, स. रणजिसिंह चिरागिया, रमेश मंत्री, कैलास शर्मा, गणपत पुरोहित ओम इन्नानी, विष्णु मानधने, बालाप्रसाद पारिख, डॉ. सुनिल मुंदडा, सुनिल काकानी, संतोष मानधने, नगरसेवक किशोर यादव, भगवान मानधने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेवटच्या दिवशीच्या भजनसंध्यामध्ये पंजाबचे प्रसिध्द गायक स. लख्खासिंग यांच्या भजनाचे आयेाजन करण्यात आले होते. 
आपल्या भजनामध्ये श्रीरामभक्त हनुमानाची महती गायली,
रघुकुलरीत सदा चली आयी
प्राण जाये पर वचन ना जाये

श्रीरामांनी आपल्या कार्याप्रति सदैव निष्ठा ठेवली होती. त्यांनी दिलेला शब्द पाळला, आपल्या आई-वडीलांनी दिलेला 14 वर्षे वनवासाचा आदेश देखील शिरसंवाद्य मानून वनवास पूर्ण केला. श्रीराम हे एक आदर्श व्यक्तीमत्त्व असून राजा कसा असावा, पुत्र कसा असावा आणि आपल्या भक्तांची काळजी घेणारा भक्तवत्सल गुरू कसा असावा, याबाबत एक आदर्श आहे. त्याचबरोबर एक आदर्श भक्त कसा असावा, याचे उदाहरण घ्यायचे असेल तर श्रीरामभक्त हनुमान हे आहे, आपल्या पित्याचे राज्य सोडून गुरू श्रीरामाची सेवा करण्याकरिता हनुमानाने हे कष्ट घेतले, ते श्रीरामचरित्रात उल्लेखनिय आहेत, असेही ते म्हणाले.

‘साज ताकद पर किसको नाज है
एक सितारा असमा का किसके पास है
मेरे बजरंगबली जैसा इस जहॉ मे कौन है’’

रामचरित्रात श्रीरामभक्त हनुमानाने अत्यंत महत्त्वाची भुमिका बजावली असून हनुमानाचे रामचरित्रातील आगमन रामचरित्राला एक वेगळी दिशा देणारे आहे. या भजनसंध्येमध्ये त्यांनी भक्ती कशी असावी, याबाबत हनुमानाचे उदाहरण दिले. आपण आपल्या दिवसाच्या 24 तासापैकी किमान 24 सेंकद तरी भगवंताचे भजन गायले पाहिजे. या भजनसंध्येला नांदेडसह ग्रामीण भागातून हजारो भाविक भक्तांनी उपस्थिती नोंदविली होती.

माळाकोळी येथील पाणी परिषद

मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यायचा निर्धार...

नांदेड(अनिल मादसवार)पाणी ही राष्ट्री य संपत्तीे घोषित करण्यात यावी या ठरावासह लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे आज झालेल्या‍ पाणी परिषदेत मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्याक्त करण्यात आला. राज्‍याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी पाणी परिषदेच्या माध्यामातून पाण्याबाबत सामान्यांमध्ये सजगता निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्त‍ केली. या परिषदेस प्रमुख उपस्थित शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे प्रत्येक लोकप्रतिनिधींने पाणी या विषयाशी निगडीत काम करण्यावर भर दयावा, असे आवाहनही केले. 

माळाकोळी येथील जलसंधारणांच्या विविध कामांचा या पाणी परिषदेत श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर पाणी परिषदेचे संयोजक आमदार प्रताप पाटील चिखलीकर, खा. संजय जाधव, आमदार जयप्रकाश मुंदडा, आ. सुभाष साबणे, आ. हेमंत पाटील, आ. नागेश पाटील आष्टीकर, आ. ज्ञानराज चौगुले, जलतज्ज्ञ  या. रा. जाधव, जिल्हा परिषद सदस्य  प्रवीण पाटील चिखलीकर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन थोरात, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख, प्रताप बांगर, जिल्हाधिकारी धीरज कुमार, मनपा आयुक्ते सुशिल खोडवेकर, सहायक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड आदींची उपस्थिती होती. 

याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री श्री. रावते म्हणाले की, पाणी परिषदेच्या माध्येमातून पाणी हे जीवनात किती महत्वाचे आहे हे सजगता निर्माण करण्यािचे काम केले जाते. आगामी पावसाळ्यात त्यादृष्टीने जलसंवर्धनाचे काम होईल अशी अपेक्षा आहे. मराठवाड्यात पाणी टंचाईचे भिषण संकट आहे. गेली पाच वर्ष सतत दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. येणारे दोन महिनेही आव्हानात्मक  आहे. यावर मात करण्‍यासाठीचे प्रयत्न गावात सुरु झाले आहेत. त्यामध्ये जलयुक्ता शिवार योजनेत नांदेड जिल्ह्यात शंभरहून अधिक ठिकाणी कामे सुरु झाली आहेत. लोकसहभागातून गाळ काढण्याचे कामेही सुरु झाली आहेत. अशारितीने सर्वच घटकांनी एकत्र येवून दुष्काळाला हटवण्यासाठी प्रयत्नर करण्याची गरज आहे. त्या साठी यापुढे पाण्याविषयीच्या योजना, कामांबाबत आग्रह धरला जाणार आहे. गावांना पिण्याच्या पाण्याची आणि शेतक-यांना शेतीसाठी पाणी मिळाले पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख श्री. ठाकरे म्हणाले की, पाणी परिषदेच्या माध्यमातून रखडलेले जलसंधारण प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत असा आग्रह धरला जावा. वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी शेतक-यांच्यादृष्टिने महत्वापूर्ण अशी बंधारे, तळी खोदणे अशा कामांना प्राधान्य दिले जावे. पाणी राष्ट्रीय संपत्तीे मानली जावी त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाणी परिषद घेतली जावी व पाण्याचे महत्व पटवून दयावे. लोकप्रतिनिधीनी आपआपल्या परिसरात काम करतांना यापुढे पाणी हा विषय प्राधान्यक्रमाने घ्‍यावा. केवळ नांदेड जिल्ह्याच नव्हे तर मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्याचा निर्धार यानिमित्ताने केला जावा अशी अपेक्षाही त्यांनी केली. 

आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रास्ता विकात परिसरातील जलसंधारणाच्या विविध योजनांचा उल्ले ख करतांनाच, सध्य स्थितीतील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.  सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या  प्रतिमेचे तसेच शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. लोकसहभागातून गाळ काढण्याच्या मोहिमेत महत्वपूर्ण योगदान देणारे शेतकरी हणमंत कदम यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्तेे सत्कार करण्यात आला. पाणी परिषदेला लोहा, कंधार परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री रावते यांचे गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर स्वागत 


राज्याचे परिवहन तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आज येथे श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचे जिल्हायधिकारी धीरजकुमार, पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहिया यांनी स्वागत केले. याप्रसंगी आमदार जयप्रकाश मुंदडा, सुभाष साबणे, हेमंत पाटील, नागेश पाटील आष्टीकर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, शिवसेनेचे जिल्हाि प्रमुख मिलिंद देशमुख आदींनी स्वागत केले. महापालिका आयुक्त सुशिल खोडवेकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आदींची उपस्थिती होती. 

हनुमान जयंती

बोरगडीच्या मारोती मंदिरात भक्तांची मंदियाळी...   


हिमायतनगर(वार्ताहर)चैत्र शुद्ध १५ दि.०४ शनिवारी आलेल्या हनुमान जयंती निमित्ताने विदर्भ -तेलंगाना - मराठवाड्यातील ग्रामीण भागात प्रसीध्द असलेल्या बोरगडी मारेाती मंदिरात संकटमोचन श्री बजरंगबली जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  यावेळी जय हनुमान.. बजरंग बली की जय...पवनसुत हनुमान की जय.. अशा जयघोषात भक्तांनी नारळ फोडुन प्रसाद अर्पण केला. याप्रसंगी दर्शनासाठी हजारेा श्रध्दाळु भक्तांची मंदियाळी दाखल झाली होती.


प्रभु श्री रामचंद्राचे परमभक्त श्री हनुमान यांच्या जन्मोत्सव दिनी प्रतीमा-मुर्तीची पुजा अभीषेक केल्याने मणुष्य भयमुक्त होतो असे सांगीतले जाते. यासाठी सर्वच गाव, वाडी, तांड्याच्या बाहेर श्री बजरंग बली मुर्तीची प्रतीष्ठापना करुन मारेातीरायाचे मंदीर गावाच्या सुरक्षेच्या हेतुने उभारलेले असते. या दिवशी बजरंगबलीला प्रीय असलेली रुचकीच्या पाने - फुलांची पुष्पमाला, दस्ती टोपी, फेटा अर्पण करुन सर्व संकट, दुखः दुर करण्याची मनोकामना भक्त करतात. 

त्याच पार्शवभूमीवर दि.०४ शनिवारी संकटमोचन, दुखःनिवारक श्री बजरंगबलीचा जन्मोत्सव चैत्र पोर्णीमेच्या दिवशी मोठ्या हर्षोल्हास व मंगलमय वातावरणात बोरगडी येथील मारेाती मंदिरात पुरोहित दासा गुरु वाळके यांच्या मंगलमय मंत्रोच्चारात पार पडला. यावेळी हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे  आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते अभिषेक - महापूजा करण्यात आली. यावेळी त्यांच्या सोबत नांदेड जिल्हा उपप्रमुख संजय जाधव, बंडू पाटील, शिवाजी देशमुख, रामभाऊ ठाकरे, शंकर पाटील, यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.  तसेच तालुक्यातील सातशीव वटफळी येथील हनुमान मंदिरासह शहरातील पवनसुत हनुमान मंदिर, दक्षीन मुखी हनुमान मंदिर, पळसपुर हनुमान मंदिर, टाकराळा, सवना ज, दरेसरसम, सरसम बु, मंगरुळ, वडगांव ज, कार्ला पी.पोटा बु, सिबदरा, सिरंजणी, एकंबा, पवना, टेंभी, यासह अन्य छोट्या मोट्या गावात रामभक्त श्री  हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. त्यानीमीत्ताने सर्वच मंदिरात भजन- किर्तन, महाप्रसादाच्या पंगती करण्यात आल्या. यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. या नीमीत्ताने लागणारे नारळ, बेलफुल,पेढा, साखरेचा पेढा आदीचे भाव गगनाला भीडसल्याने भक्तांना महागाईचा फटका सहन करावा लागला आहे.

दि.०५ रविवारी सकाळी 10 वाजता बोरगडी येथील हनुमान मंदिरात हभप. मारेाती  महाराज सातारकर यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दुपारी 02 कुस्त्यांची दंगलीचे उद्घाटक होणार असुन, कुस्तीत विजेत्या मल्लाना बक्षीसे प्रदान करुन गौरवीण्यात येणार आहे. यावेळी तलुक्यातील तमाम कुस्ती शौकीन व मल्लांनी हजेरी लाऊन यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन गांवकर्यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

पारंपारीक बैलगाडीतुन हनुमान दर्शनासाठी भक्तगण दाखल 
---------------------------------------
विदर्भ - तेलंगाना - मराठवाड्यात ख्याती प्राप्त श्री बोरगडीच्या मारुती दर्शनासाठी पारंपारीक  बैलगाडीतुन हजारो भक्त दर्शनासाठी दाखल झाले असुन, या ठीकाणी आलेल्या भक्तांना पिण्याच्या पाण्यासह प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. हजारों खेळणी साहीत्यासह सौंदर्य प्रसाधनाची व आकाश पाळने, यासह चिमुकल्यांना आकर्षीत करणारे खेळणी साहीत्यानी व भक्तांच्या गर्दीने यात्रा फुलली होती.

बोरगडीला ब दर्जा......

तीर्थ क्षेत्र बोरगडीला ब दर्जा मिळून देणार...
आ.नागेश पाटील आष्टीकर 


हिमायतनगर(वार्ताहर)तीर्थ क्षेत्र बोरगडीच्या हनुमान मंदिराच्या उन्नती व विकासासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री दिवकर रावते यांच्या माध्यमातून बोरगडी मंदिराला तीर्थ क्षेत्राचा ब दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे ठोस आश्वासन हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी दिले. 

ते हनुमान जयंतीनिमित्ताने शनिवारी दि.०४ रोजी बोरगडी येथील मारोती मंदिरात अभिषेक व महापूजेसाठी आले असता बोलत होते. यावेळी माधव महाराज बोरगडीकर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख डॉ. संजय पवार, स्वीय्य सहाय्यक बंडू पाटील आष्टीकर, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, शिवाजी देशमुख, सरपंच संजय काईतवाड, शंकर पाटील, नांदेड न्युज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार, डॉ. राव यांची उपस्थिती होती. यानंतर सुरु असलेल्या हभप.व्यंकटी महाराज कामारीकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे, खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची मला चिंता आहे. हदगाव - हिमायतनगर कोरडा दुष्काळ जाहीर कराव यासाठी मी मुख्यमंत्र्याकडे प्रस्ताव व्यक्त केला आहे, लवकरच शेतकर्यांना नुकसानीची भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळणार आहे. हदगाव - हिमायतनगर तालुक्याच्या विकासासाठी मी बांधील आहे. आगामी काळात विकासासाठी स्वतः सर्व गाव - गावात भेट देवून समस्या जाणून घेवून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन असेही ते म्हणाले.  यावेळी माउली ज्ञानेश्वर महाराज, मंदिर समितीचे अध्यक्ष संजय भैरेवाड, सचिव लक्ष्मण भैरेवाड, उपाध्यक्ष गणपत काईतवाड, के.बी.शेन्नेवाड, दगडू काईतवाड, बजरंग शिंदे, विलास काईतवाड यांच्यासह अनेक शिवसैनिक कार्यकर्ते व हनुमान भक्त नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.