बोरगडीच्या मारोती मंदिरात भक्तांची मंदियाळी...
हिमायतनगर(वार्ताहर)चैत्र शुद्ध १५ दि.०४ शनिवारी आलेल्या हनुमान जयंती निमित्ताने विदर्भ -तेलंगाना - मराठवाड्यातील ग्रामीण भागात प्रसीध्द असलेल्या बोरगडी मारेाती मंदिरात संकटमोचन श्री बजरंगबली जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जय हनुमान.. बजरंग बली की जय...पवनसुत हनुमान की जय.. अशा जयघोषात भक्तांनी नारळ फोडुन प्रसाद अर्पण केला. याप्रसंगी दर्शनासाठी हजारेा श्रध्दाळु भक्तांची मंदियाळी दाखल झाली होती.
प्रभु श्री रामचंद्राचे परमभक्त श्री हनुमान यांच्या जन्मोत्सव दिनी प्रतीमा-मुर्तीची पुजा अभीषेक केल्याने मणुष्य भयमुक्त होतो असे सांगीतले जाते. यासाठी सर्वच गाव, वाडी, तांड्याच्या बाहेर श्री बजरंग बली मुर्तीची प्रतीष्ठापना करुन मारेातीरायाचे मंदीर गावाच्या सुरक्षेच्या हेतुने उभारलेले असते. या दिवशी बजरंगबलीला प्रीय असलेली रुचकीच्या पाने - फुलांची पुष्पमाला, दस्ती टोपी, फेटा अर्पण करुन सर्व संकट, दुखः दुर करण्याची मनोकामना भक्त करतात.
त्याच पार्शवभूमीवर दि.०४ शनिवारी संकटमोचन, दुखःनिवारक श्री बजरंगबलीचा जन्मोत्सव चैत्र पोर्णीमेच्या दिवशी मोठ्या हर्षोल्हास व मंगलमय वातावरणात बोरगडी येथील मारेाती मंदिरात पुरोहित दासा गुरु वाळके यांच्या मंगलमय मंत्रोच्चारात पार पडला. यावेळी हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते अभिषेक - महापूजा करण्यात आली. यावेळी त्यांच्या सोबत नांदेड जिल्हा उपप्रमुख संजय जाधव, बंडू पाटील, शिवाजी देशमुख, रामभाऊ ठाकरे, शंकर पाटील, यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. तसेच तालुक्यातील सातशीव वटफळी येथील हनुमान मंदिरासह शहरातील पवनसुत हनुमान मंदिर, दक्षीन मुखी हनुमान मंदिर, पळसपुर हनुमान मंदिर, टाकराळा, सवना ज, दरेसरसम, सरसम बु, मंगरुळ, वडगांव ज, कार्ला पी.पोटा बु, सिबदरा, सिरंजणी, एकंबा, पवना, टेंभी, यासह अन्य छोट्या मोट्या गावात रामभक्त श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. त्यानीमीत्ताने सर्वच मंदिरात भजन- किर्तन, महाप्रसादाच्या पंगती करण्यात आल्या. यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. या नीमीत्ताने लागणारे नारळ, बेलफुल,पेढा, साखरेचा पेढा आदीचे भाव गगनाला भीडसल्याने भक्तांना महागाईचा फटका सहन करावा लागला आहे.
दि.०५ रविवारी सकाळी 10 वाजता बोरगडी येथील हनुमान मंदिरात हभप. मारेाती महाराज सातारकर यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दुपारी 02 कुस्त्यांची दंगलीचे उद्घाटक होणार असुन, कुस्तीत विजेत्या मल्लाना बक्षीसे प्रदान करुन गौरवीण्यात येणार आहे. यावेळी तलुक्यातील तमाम कुस्ती शौकीन व मल्लांनी हजेरी लाऊन यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन गांवकर्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
पारंपारीक बैलगाडीतुन हनुमान दर्शनासाठी भक्तगण दाखल
---------------------------------------
विदर्भ - तेलंगाना - मराठवाड्यात ख्याती प्राप्त श्री बोरगडीच्या मारुती दर्शनासाठी पारंपारीक बैलगाडीतुन हजारो भक्त दर्शनासाठी दाखल झाले असुन, या ठीकाणी आलेल्या भक्तांना पिण्याच्या पाण्यासह प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. हजारों खेळणी साहीत्यासह सौंदर्य प्रसाधनाची व आकाश पाळने, यासह चिमुकल्यांना आकर्षीत करणारे खेळणी साहीत्यानी व भक्तांच्या गर्दीने यात्रा फुलली होती.