माळाकोळी येथील पाणी परिषद

मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यायचा निर्धार...

नांदेड(अनिल मादसवार)पाणी ही राष्ट्री य संपत्तीे घोषित करण्यात यावी या ठरावासह लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे आज झालेल्या‍ पाणी परिषदेत मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्याक्त करण्यात आला. राज्‍याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी पाणी परिषदेच्या माध्यामातून पाण्याबाबत सामान्यांमध्ये सजगता निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्त‍ केली. या परिषदेस प्रमुख उपस्थित शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे प्रत्येक लोकप्रतिनिधींने पाणी या विषयाशी निगडीत काम करण्यावर भर दयावा, असे आवाहनही केले. 

माळाकोळी येथील जलसंधारणांच्या विविध कामांचा या पाणी परिषदेत श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर पाणी परिषदेचे संयोजक आमदार प्रताप पाटील चिखलीकर, खा. संजय जाधव, आमदार जयप्रकाश मुंदडा, आ. सुभाष साबणे, आ. हेमंत पाटील, आ. नागेश पाटील आष्टीकर, आ. ज्ञानराज चौगुले, जलतज्ज्ञ  या. रा. जाधव, जिल्हा परिषद सदस्य  प्रवीण पाटील चिखलीकर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन थोरात, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख, प्रताप बांगर, जिल्हाधिकारी धीरज कुमार, मनपा आयुक्ते सुशिल खोडवेकर, सहायक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड आदींची उपस्थिती होती. 

याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री श्री. रावते म्हणाले की, पाणी परिषदेच्या माध्येमातून पाणी हे जीवनात किती महत्वाचे आहे हे सजगता निर्माण करण्यािचे काम केले जाते. आगामी पावसाळ्यात त्यादृष्टीने जलसंवर्धनाचे काम होईल अशी अपेक्षा आहे. मराठवाड्यात पाणी टंचाईचे भिषण संकट आहे. गेली पाच वर्ष सतत दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. येणारे दोन महिनेही आव्हानात्मक  आहे. यावर मात करण्‍यासाठीचे प्रयत्न गावात सुरु झाले आहेत. त्यामध्ये जलयुक्ता शिवार योजनेत नांदेड जिल्ह्यात शंभरहून अधिक ठिकाणी कामे सुरु झाली आहेत. लोकसहभागातून गाळ काढण्याचे कामेही सुरु झाली आहेत. अशारितीने सर्वच घटकांनी एकत्र येवून दुष्काळाला हटवण्यासाठी प्रयत्नर करण्याची गरज आहे. त्या साठी यापुढे पाण्याविषयीच्या योजना, कामांबाबत आग्रह धरला जाणार आहे. गावांना पिण्याच्या पाण्याची आणि शेतक-यांना शेतीसाठी पाणी मिळाले पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख श्री. ठाकरे म्हणाले की, पाणी परिषदेच्या माध्यमातून रखडलेले जलसंधारण प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत असा आग्रह धरला जावा. वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी शेतक-यांच्यादृष्टिने महत्वापूर्ण अशी बंधारे, तळी खोदणे अशा कामांना प्राधान्य दिले जावे. पाणी राष्ट्रीय संपत्तीे मानली जावी त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाणी परिषद घेतली जावी व पाण्याचे महत्व पटवून दयावे. लोकप्रतिनिधीनी आपआपल्या परिसरात काम करतांना यापुढे पाणी हा विषय प्राधान्यक्रमाने घ्‍यावा. केवळ नांदेड जिल्ह्याच नव्हे तर मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्याचा निर्धार यानिमित्ताने केला जावा अशी अपेक्षाही त्यांनी केली. 

आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रास्ता विकात परिसरातील जलसंधारणाच्या विविध योजनांचा उल्ले ख करतांनाच, सध्य स्थितीतील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.  सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या  प्रतिमेचे तसेच शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. लोकसहभागातून गाळ काढण्याच्या मोहिमेत महत्वपूर्ण योगदान देणारे शेतकरी हणमंत कदम यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्तेे सत्कार करण्यात आला. पाणी परिषदेला लोहा, कंधार परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री रावते यांचे गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर स्वागत 


राज्याचे परिवहन तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आज येथे श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचे जिल्हायधिकारी धीरजकुमार, पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहिया यांनी स्वागत केले. याप्रसंगी आमदार जयप्रकाश मुंदडा, सुभाष साबणे, हेमंत पाटील, नागेश पाटील आष्टीकर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, शिवसेनेचे जिल्हाि प्रमुख मिलिंद देशमुख आदींनी स्वागत केले. महापालिका आयुक्त सुशिल खोडवेकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आदींची उपस्थिती होती. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी