बोरगडीला ब दर्जा......

तीर्थ क्षेत्र बोरगडीला ब दर्जा मिळून देणार...
आ.नागेश पाटील आष्टीकर 


हिमायतनगर(वार्ताहर)तीर्थ क्षेत्र बोरगडीच्या हनुमान मंदिराच्या उन्नती व विकासासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री दिवकर रावते यांच्या माध्यमातून बोरगडी मंदिराला तीर्थ क्षेत्राचा ब दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे ठोस आश्वासन हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी दिले. 

ते हनुमान जयंतीनिमित्ताने शनिवारी दि.०४ रोजी बोरगडी येथील मारोती मंदिरात अभिषेक व महापूजेसाठी आले असता बोलत होते. यावेळी माधव महाराज बोरगडीकर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख डॉ. संजय पवार, स्वीय्य सहाय्यक बंडू पाटील आष्टीकर, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, शिवाजी देशमुख, सरपंच संजय काईतवाड, शंकर पाटील, नांदेड न्युज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार, डॉ. राव यांची उपस्थिती होती. यानंतर सुरु असलेल्या हभप.व्यंकटी महाराज कामारीकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे, खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची मला चिंता आहे. हदगाव - हिमायतनगर कोरडा दुष्काळ जाहीर कराव यासाठी मी मुख्यमंत्र्याकडे प्रस्ताव व्यक्त केला आहे, लवकरच शेतकर्यांना नुकसानीची भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळणार आहे. हदगाव - हिमायतनगर तालुक्याच्या विकासासाठी मी बांधील आहे. आगामी काळात विकासासाठी स्वतः सर्व गाव - गावात भेट देवून समस्या जाणून घेवून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन असेही ते म्हणाले.  यावेळी माउली ज्ञानेश्वर महाराज, मंदिर समितीचे अध्यक्ष संजय भैरेवाड, सचिव लक्ष्मण भैरेवाड, उपाध्यक्ष गणपत काईतवाड, के.बी.शेन्नेवाड, दगडू काईतवाड, बजरंग शिंदे, विलास काईतवाड यांच्यासह अनेक शिवसैनिक कार्यकर्ते व हनुमान भक्त नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी