युनिसेफच्या संवाद साहित्याने...स्वच्छते विषयी जिल्हयात करण्यात येणार जनजागृती
नांदेड(प्रतिनिधी)नांदेड जिल्हयाने शौचालय बांधकामामध्ये राज्यात सर्वाधिक शौचालय बांधुन विक्रम केला आहे. त्यामुळे चालु आर्थिक वर्षात 85 हजार शौचालयाचे उदिष्ट राज्य शासनाने दिले आहे.
शौचालयाचे 85 हजाराचे उदिष्ट साध्य करण्यासाठी गावस्तरावर नागरिकांची मानसिकता बदलण्यासाठी माहिती, शिक्षण व संवादाचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एल. रामोड यांनी दिली आहे. स्वच्छताक्षेत्रात लोकांची मानसिकता बदलण्यासाठी युनिसेफ मार्फत विविध माहिती शिक्षण व संवादाचे टुल्स तयार करण्यात आले आहेत. याव्दारे महिला बचतगट, शाळेतील विद्यार्थी, युवक व युवती मंडळ, ग्राम पंचायतीचे सदस्य, गावस्तरावरील विविध समित्या आदींसाठी या संवाद साहित्यांचा वापर करण्यात येणार आहे.
युनिसेफ यांनी तयार केलेल्या संवाद साहित्याची हाताळणी कशी करावी, त्यांचा वापर कसा करावा यासंर्भात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे यांनी तालुकास्तरीय गट समन्वयक व समुह समन्वयक यांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना माहिती दिली आहे. पाणी व स्वच्छतेविषयी भाषण किंवा संवादाच्या माध्यमाने गावक-यांना स्वच्छतेची माहिती देतांना युनिसेफच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संवाद साहित्याचा उपयोग करण्यात येणार आहे. यात प्रत्यक्ष लाभार्थींना स्वच्छतेविषयी माहिती देण्यात येणार आहे. युनिसेफच्या संवाद साहित्याची एक किट सर्व तालुक्यांना देण्यात येणार आहे.
युनिसेफच्या संवाद साहित्य टूल्समध्ये हात धुण्याच्या पध्दती, शुध्द पाण्याचे महत्व, गाव कृती आराखडा, स्वच्छ व सुंदर गाव, दुषित वातावरणामुळे पसरणारे आजार व त्यावरील उपाय, उघडयावरील हागणरीमुळे होणारे दुष्परिणाम, डायरियावर (अतिसार) घरच्या घरी उपचार, फ्फिप चार्टवरुन स्वच्छतेविषयी ग्रामस्थांनासाठी चित्र विषयक कथा सांगणे अशा आकरा संवाद टूल्सचा यात समावेश आहे. विशेषतः महिला बचतगट, शालेय विद्यार्थी, युवक-युवती यांच्या छोटया ग्रुपमध्ये या माध्यमांचा चांगला प्रभाव पडेल, असे मत जी.एल.रामोड यांनी व्यक्त केले आहे.