आडेली मातेच्या दर्शनास जाणाऱ्या भावीकांचा बोलेरो पिकअप टेम्पो पलटी....NNL

अपघातात १८ भाविक गंभीर जखमी... गंभीर जखमी 4 भावीकाना नांदेड येथे हलवले...   

किनवट, माधव सूर्यवंशी| शिवणी येथील पेट्रोल पंपाच्या जवळ हदगाव तालुक्यातील हस्तरा (बोरगाव) गावच्या भाविकांचा बोलेरो पिकअप टेम्पो पलटी होऊन या अपघातात टेम्पो मधील १८ भावीक गंभीर जखमी झाल्याची घटना दि 2 आँक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान घडली आहे. शिवणी येथील तरुणांनी जखमीना येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्र येथे नेऊन प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नांदेड येथे नेण्यात आले असल्याचे कळाले आहे.

हदगाव तालुक्यातील हस्तरा गावचे रहिवासी असलेले नागरिक आपल्या मुलाचा नवस फेडण्यासाठी तेलंगणा राज्यांतील निर्मल जिल्यातील प्रसिद्ध असलेल्या आडेली देवीला जात असताना एम. एच. २६ एच. ३५४८ या पिकअप टेंम्पोने दि.2 आँक्टोबर रविवारी सकाळी ७ वाजता आपल्या गावातून देवीच्या दर्शनाला निघाले होते. शिवणी येथील पेट्रोल पंपाजवळ आल्यावर सकाळी 9 वाजेच्या सुमारास वाहन शिवणी येथील पेट्रोल पंपाच्या जवळ वळण रस्ता असल्याने बाजूला आजीबाई बसलेले होते. त्या आजीबाईची डोके गाडीच्या काचेवर लागल्यामुळे वाहन चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटून आपघात झाल्याचे सांगितले. हा अपघात झाल्याची माहीती शिवणी गावातील नागरीक व नवयुवकाना कळताच घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना शिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळेल त्या वाहनाने आणण्यात आले. जखमीची संख्या जास्त असल्याने उपचारासाठी खाजगी  डॉक्टरांची मदत घ्यावी लागली. यात डॉ. संदीप सोनटक्के व डॉ. विठ्ठल अपलोड यांनी जखमीवर उपचार केले.


या अपघातात जखमी झालेले भाविक लोभाजी जाधव वय ३६,कोंडाबाई रामराव जाधव वय ६० साहेबराव रामराव जाधव वय ५०, आशा लोभाजी जाधव वय २८ वर्षे,गणेश प्रमोद वानखेडे वय १० वर्षे,प्रकाश लोभाजी जाधव वय १२ वर्षे,चतुराबाई किशन ठाकरे ६०,गोदाबाई देवानंद सोळंके ४०,खंडेराव बाजीराव सोळंके ४५, प्रभाकर रामराव जाधव ५०,शंकर रामराव सरोदे ५०. सुभाष रामराव जाधव ५०, रणदीप सुभाष जाधव ४०, प्रथमेश लुबाजी जाधव १२, कौशल्य शंकराव सरोद ५०, सुमनबाई सुभाष जाधव ६०,प्रभाकर दत्ताराम सावंतकर ४०,गोदावरी शिवराम काळ ३०, आदिराज प्रभाकर सोळंके यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला प्राथमिक उपचार करून नांदेड येथे हलवण्यात आले आहे. यामध्ये भाग्यश्री जाधव, लोभाजी जाधव, संदीप जाधव, कोंडाबाई जाधव व ड्रायव्हर घुगे यांचा समावेश आहे. या अपघाताची माहिती कळताच गावातील राजकीय सामाजिक कार्यकर्ते सह शिवणी येथील सरपंच सौ.लक्ष्मीबाई डुडुळे,पोलीस कर्मचारी निवळे पाटील  यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी