नांदेड| महात्मा गांधीजींनी शांतता व अहिंसेच्या मार्गाने देशाला ब्रिटिश सत्तेपासून मुक्त करत जगाला अहिंसात्मक क्रांतीचा नवा मार्ग दाखवला. खेड्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी ग्रामस्वराज्य संकल्पना मांडली. गांधीजींचे विचार व मूल्ये आजच्या काळात तेवढीच समर्पक आहेत. आणि लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या राजनैतिक कौशल्य व दूरदृष्टीने देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. अत्यंत साधेपणाने जगत देशनिष्ठेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. 'जय जवान, जय किसान' या घोषवाक्याने भारतीयांना प्रेरित करणारे..!
माजी. पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी, दिनांक: 02 ऑक्टोबर 2022 रोजी. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे, राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी, एम. एस. मुळे, शिवाजी देशमुख, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, संजय मंत्रे लहानकर यांची उपस्थिती होती.