हदगाव| कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने उत्सव सणावर साजरा करण्याविषयी जे निर्बंध घातलेले होते ते आता शिथील करण्यात आले आहे. तरी पोलिस प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसारच गणेशउत्सव सण व राष्ट्रीय पुरुषाचे जयती साजरी करण्याचे अहवान हदगाव तालुक्याचे तहसिलदार तथा दडाधिकारी जीवराज डापकर यांनी केले.
ते शुक्रवारी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हदगाव पोलिस स्टेशनने आयोजित केलेल्या शांताता बैठकीत केले. या बैठकीचे प्रवास्तिक पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक हनुंमत गायकवाड यांनी केलं. या बैठकीला माञ उपविभागीय अधिका-यासह अनेक अधिका-याची अनुउपस्थिती दिसुन आली. तहसिलदार डापकर यांनी ७५ व्या सुवर्ण मोहस्तव निमित्तानं हर घर तिरँगा झेंडा या या राष्ट्रीय उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे. तिरंगा राष्ट्रीय ध्वज हे बचत गटाच्या माध्यमातून विक्री केले जाणार आहे. त्याचा फायदा घ्यावा असे अहवान त्यानी यावेळी केल.
उपविभागीय आधिका-यासह अनेक अधिकारी. राजकीय नेते गैरहजर
हदगाव पोलिस स्टेशनने आयोजित केलेल्या शांताता बैठकीला उपविभागीय अधिकारी, न.पा. मुख्याधिकारी, सा.बा उपविभागीय अधिका-यास शहरातील विविध राजकीय नेते पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते माञ या शाताता बैठकीला दिसुन आले नाही. विशेष म्हणजे बैठक जरी शांतता कमेटीची असली तरी या बैठकीत शहरातील खड्डे नालेसफाई निघणा-या मिरवणूक दृष्टिकोनातून यावेळी सुचना फार महत्त्वाचे असतात. पण संबंधित अधिकारी अश्या महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारतात आम्हीच का बैठकीला यावे असा प्रश्न नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त करावं विचारल्याचे दिसुन आले. आज शांतता कमेटीची बैठक आहे अस ऐनवेळी कळविण्यात आले. तसेच शुक्रवार हा साप्ताहीक बाजारचा दिवस असल्याने अनेक नागरिकांना शातांता बैठकिला हजर राहू शकले नाही हे आवर्जून उल्लेख करावा लागेल. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उप पोलिस निरक्षक मोरे यांनी केलं.