उस्माननगर, माणिक भिसे| शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघ यांच्यावतीने जिल्हा परिषद नांदेड येथे दि.४ मार्च रोजी शुक्रवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य बहुजन महासंघ गेल्या ५० वर्षांपासून मागासवर्गीय शिक्षकांचे सामाजिक व सेवे विषयक प्रश्न सातत्याने मांडून ते सनदशिर मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न करत आहे.मागासवर्गीयांचे प्रश्न सोडवितांना जिल्हा परिषद प्रशासन दुजाभाव करीत असल्याची जाणीव होते.संदर्भीय निवेदनाद्वारे महासंघाने प्रश्न सोडविण्याची विनंती केली होती.परंतू त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही.
अनेकवर्षा पासुन महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाकडून निवेदनाद्वारे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना २६ मागण्याचे निवेदन दिले होते. या निवेदनाकडे प्रशासानाचे लक्ष वेधण्यासाठी ४ मार्च रोजी जिल्हा परिषद समोर एक दिवसीय कार्यालयीन वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी जगन ढवळे ( जिल्हाध्यक्ष) , शिवाजी सावते ( विभागीय अध्यक्ष) ,डि.एम.हानुमंते ( राज्यध्यक्ष) आर.जी.वाघमारे (जिल्हा सचिव) , पाईकराव लोकेश ( जि.कोषाध्यक्ष),बी.आर.सोनकांबळे ( जि.कार्यध्यक्ष) गणेश भालेराव ( जिल्हा उपाध्यक्ष) एन.आर.पारधे (जिल्हा उपाध्यक्ष)व्ही.बी.सोनटक्कै ( जिल्हा प्रसिद्धी प्रमुख) शैलैश कौठकेकर (जिल्हा संघटक) सिंगारपुतळे विलास एस.(जिल्हा संघटक) राहुल कांबळे ( जिल्हा सहसचिव) यांच्यासह अनेक शिक्षक कर्मचारी यांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन दिले आहे.जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी व शासकीय कार्यालये यांना निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत.