सदस्यपदी डॉ.सत्यभामा जाधव, किशोर नावंदे, अॅड.रेखा तोरणेकर आणि संगीता कांबळे
नांदेड| महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाने एका अधिसुचनेनुसार नांदेड जिल्ह्यात बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदी अॅड.राजवंतसिंघ कदम्ब यांची नियुक्ती पुढील तीन वर्षासाठी केली आहे. राजवंतसिंग हे उच्च शिक्षीत असून त्यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. सोबतच इतर तीन महिला आणि एक पुरूष अशा चार जणांची बाल कल्याण समिती नांदेड जिल्ह्यावर नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने 2 जून 2022 रोजी जारी केलेल्या अधिसुचनेनुसार बालकल्याण समिती नांदेड ज्या समितीचे व्यवसायीक कार्यक्षेत्र संपूर्ण नांदेड जिल्हा आहे. या समितीवर अध्यक्षपदी अॅड.राजवंतसिंघ सुरेंद्रसिंघ कदम्ब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यासोबतच डॉ.सत्यभामा विलास जाधव, किशोर नागोराव नावंदे, अॅड.रेखा वैजनाथ तोरणेकर आणि संगीता रामेश्वर कांबळे या चार जणांची नियुक्ती बालकल्याण समिती नांदेडच्या सदस्य पदावर करण्यात आली आहे. या सर्व पदाधिकार्यांच्या कार्यकाळ 2 जून 2022 पासून पुढील तीन वर्ष असणार आहे. या अधिसुचनेवर शासनाचे सहसचिव श.ल.अहिरे यांची स्वाक्षरी आहे. निवडीबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
