हिमायतनगर। तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत दरेगाव या गावांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, प्रथमच थेट सरपंच हा जनतेतून निवडला जाणार आहे.
तालुक्यातील एकमेव अशी दरेगाव ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला असून यामध्ये दि.१८ नोव्हेंबर ला सदर निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्र दि. २८ नोव्हेंबर ते दि. ०२ डिसेंबर सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत पर्यंत सादर करण्यात येणार आहेत.
तर दि. ०५ डिसेंबर सोमवारी सकाळी ११ वाजतापासून नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. दि. ०७ डिसेंबर बुधवार ला दुपारी तिन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुभा देण्यात आली आहे. तर बुधवारीच दुपारी तिन नंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात मतदान दि.१८ डिसेंबर रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होणार आहे.
तर दि. २३ डिसेंबरला मतमोजनी व निवडणुकीचा निकाल अर्थात विजयी उमेदवार घोषित करण्यात येणार असल्याची माहीती तहसीलदार डी.एन.गायकवाड, राठोड यांनी दिली आहे. तालुक्यात प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने निवडणुकीची उत्सूकता शिगेला पोहचली असून नैसर्गिक थंडीत वातावरणात गरम झालेले पहावयास मिळत आहे.