चिंतनाच्या पातळीवर परिपूर्ण असलेली कविता म्हाणजे व्यक्त अव्यक्त कवितासंग्रह-देविदास फुलारी -NNL


नांदेड|
अंतर्मनातून आलेले शब्द कवितेच्या प्रांतात आपली नवी ओळख निर्माण करतात. तसेच चिंतनाच्या पातळीवर परिपूर्ण असलेली कविता हीच साहित्याची खरी ओळख असते.कवी जनक यांची कविता आणि त्यांचे शब्द नवी ओळख निर्माण करणारे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत देवीदास फुलारी यांनी केले.

हाळदा गावचे भूमिपुत्र आणि नवोदित कवी जनक जगदीश कुलकर्णी यांच्या व्यक्त -अव्यक्त या कविता संग्रहाचे प्रकाशन नुकतेच नांदेड येथील ताज पाटील च्या सभागृहात संपन्न झाले.त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कंधार-लोहा विधानसभेचे आमदार आणि हाळदा गावचे भूमिपुत्र श्यामसुंदर शिंदे,समाजसेविका सौ. आशाताई शिंदे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंग्रजी विभागाचे प्रमुख, विचारवंत प्रा.डॉ. दिलीप चव्हाण, लेखक, कवी आणि शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि कवी शिवा कांबळे, साहित्यिक प्रा. धाराशिव शिराळे, रोहित शिंदे, जेष्ठ पत्रकार धोंडोपंत विष्णुपुरीकर, भार्गव राजे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक, संभाजी आलेवाड, वैजनाथ हंगरगे, उर्दु घराचे व्यवस्थापक प्राचार्य सुजात अली, प्राचार्य हिराप्रकाश बोड्डावार, उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के, यशवंतराव शिंदे, डॉ. अंजली दिग्रसकर, संतोष लोंढे, प्रा. अजित बुरपल्ले, विश्वनाथ देशमुख, रुकमाजी चव्हाण, संदीप पांडे, सिमंत पांडे, प्रकाशक संजय सुरनर आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना देवीदास फुलारी म्हणाले की, जनक कुलकर्णी यांच्या कवितेला वैश्विक अधिष्ठान असून त्यांच्या कवितेला सामाजिक मूल्ये असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कंधार लोहा विधानसभा मतदार संघाचे आमदार शामसुंदर शिंदे म्हणाले की लेखक आणि कवींनी महाराष्ट्राला एक नवा विचार दिला असून आमच्या गावचा जनक कुलकर्णी यांनी साहित्य प्रांतात  असलेली भरारी निश्चितच आमच्या गावासाठी अभिमानाची बाब असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी प्रसिद्ध समाज सेविका आशाताई शिंदे यांनी जनकच्या साहित्यकृतीचे कौतुक केले. प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. दिलीप चव्हाण यांनी मराठी साहित्यातील अनेक पैलूचा धांडोळा घेत जनकच्या साहित्यकृतीचे कौतुक केले.साहित्य हे जगण्याला प्रेरणा देते. कमी वयात जनक कुलकर्णी यांनी साहित्यवर्तुळात केलेले पदार्पण निश्चितच प्रेरणादायी असून त्यांच्या प्रत्येक कवितेतून मानवी मनाच्या भावभावनांचा समर्पक असे मूल्ये असल्याचे मत शिक्षण विस्तार अधिकारी आणि कवी व्यंकटेश चौधरी यांनी मांडले. साहित्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि परिवर्तनाची नवी दिशा मिळत असून जनक कुलकर्णी यांच्या कवितेतून परिवर्तनाचा आणि प्रबोधनाचा विचार असल्याचे मत राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा कवी शिवा कांबळे यांनी मांडले.

 कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन डॉ.अनुराधा पत्की यांनी केले तर आभार पंकजा कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री पुरुषोत्तम हळदेकर, दत्तात्रय कुलकर्णी, श्रीनिवास पवळे, अभिजीत हळदेकर, विश्वेश कुलकर्णी, श्रद्धा झंवर, अभिषेक भुरे, ज्योती गायकवाड, विठ्ठल मोरे, ख्वाजा सिद्दिकी, मारोती गौलोर, माधव पटने, आदित्य देशमुख, अभय कुलकर्णी, आकाश कुलकर्णी, आदेश हंगरगे, सुदेश हंगरगे, यांनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी