जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कार्यवाही करा -कामेवार

आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या कडे मागणी 


नांदेड|
गेल्या अनेक वर्षांपासून नांदेड जिल्ह्यामध्ये शहरी तसेच ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करन्याची मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे नांदेड कक्ष प्रमुख सुभाशिष कामेवार यांनी आरोग्य मंत्री डाॅ.तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.

कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण न घेता शेकडो डॉक्टर सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. परंतु जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. एखादी कार्यवाही वगळता कुठेही कार्यवाही आरोग्य विभागामार्फत केली गेलेली नाही. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बिंदीकतपणे बोगस डॉक्टर नागरिकांची लूट करत आहेत. वैद्यकीय क्षेत्राचा कुठलेही शिक्षण व अनुभव नसताना ग्रामीण भागात उपचाराचा नावाखाली सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळले जात आहे.  त्यामुळे तात्काळ नांदेड जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेशित करून सर्व बोगस डॉक्टर वर कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी