नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे नाट्यशास्त्र विषयात येथील संशोधक विद्यार्थी आणि प्रसिद्ध रंगकर्मी अभिनेता राम नारायणराव चव्हाण यांना पीएच. डी. (विद्यावाचस्पती) पदवी जाहीर केली आहे.
डॉ. राम चव्हाण यांनी "साठोत्तरी मराठी राजकीय नाटक: एक चिकित्सक अभ्यास" या विषयावर डॉ. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडे आपला शोध प्रबंध सादर केला होता. डॉ. राम चव्हाण हे १९९० पासून पथनाट्य, नाट्याभिनय, नाट्य लेखन, एकांकिका लेखन, काव्य लेखन अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
'आभास', 'रझाकार', 'पाटील', 'आमदार निवास', 'इच्चार ठरला पक्का' तसेच नुकतेच नांदेड येथे गाजत असलेल्या 'राडा' या बहुचर्चित चित्रपटात अभिनयाची छाप सोडली आहे. राज्यस्तरावरील विविध नाट्य स्पर्धांमध्ये अनेक नाटकांमधून डॉ. राम चव्हाण यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. राज्यातील विविध विद्यापीठांच्या युवक महोत्सव आणि राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांचे परीक्षक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. नांदेड येथील सामाजिक-सांस्कृतिक चळवळीतही ते सक्रिय आहेत.
डॉ. राम चव्हाण यांना विद्यापीठातर्फे पीएच.डी. पदवी जाहीर झाल्याबद्दल डॉ. मुस्तजीब खान पठाण, डॉ. दासू वैद्य, डॉ. प्रेषित रूद्रावार, डॉ.पृथ्वीराज तौर, डॉ. वैजनाथ अनमूलवाड, डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ.विठ्ठलसिंह परिहार, डॉ. मारुती कच्छवे, डॉ. बळीराम लाड, डॉ. केशव देशमुख, डॉ. अनुराधा जोशी पत्की, डॉ. नाथा चितळे , डॉ विकास कदम, हुशार सिंग साबळे, डॉ. शेखर घुंगरवार, डॉ. पी. विठ्ठल, सिने दिग्दर्शक राजेश दुर्गे, प्रमोद देशमुख, संदेश कुलकर्णी, एडवोकेट साहेबराव शेळके दिनेश कवडे, कुणाल गजभारे, मायाताई भद्रे, सचिन किसवे, डॉ. विलासराज भद्रे, कैलास पोपुलवार, गोविंद हंबर्डे, सुभाष सारंगधर, माणिक नाईकवाडे, गुरमीत सिंग रागी, रवींद्र सिंग मोदी, नागेश गिरगावकर, हेमा काबरा, मनीषा धूत, नितीन शेवडकर, पंढरीनाथ घोंगडे, प्रदीप यशवंतकर, उल्हास कोटगिरे आदींसह विविध क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.