लोहा -कंधार तालुक्यात उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थिती सेवा पंधरवाडा अभियानाची सुरुवात-NNL


लोहा|
महाराष्ट्र शासनाने १७  सप्टेंबर  ते २ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अभियान रराबविले जात आहे. लोहा कंधार या दोन्ही तालुक्यातील महसूल कर्मचारी -अधिकारी यांच्या बैठकीत उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्या उपस्थितीत या सेवा पंधरवाडयास सुरुवात करण्यात आली.शिधा पत्रिका, जात व इतर प्रमाणपत्र त्या त्या लाभार्थ्यांना देऊन सुरुवात करण्यात आली असे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सांगितले

सेवा पंधरवाडा या अभियान मार्फत जनतेची कामे विहीत कालमर्यादित पूर्ण करणे तसेच नागरिकांचे ऑनलाइन अर्ज कालमर्यादेत निपटारा करणे या अनुषंगाने आपले सरकार पोर्टल, महावितरण पोर्टल, डीबीटी पोर्टल व नागरी सेवा केंद्र मार्फत देण्यात येणारे विविध शासकीय सेवा व अंतर्गत प्रलंबित असलेले लाभ नागरिकांना देणे, त्याचबरोबर या पंधरवाडा कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णय निर्णयानुसार निधीचे वितरण करणे ,प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे  पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित पात्र शेतकरी यांना लाभ देणे ,विविध प्रमाणपत्र व शिधापत्रिका पात्र लाभार्थ्यांना वितरित करणे तसेच इतर विभागाकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, मालमत्ता  नोंदी करणे, नवीन नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करून मागणी करणे ,अनुसूचित जमातीचे लाभार्थ्यांना लाभ देणे ,वनपट्टे मंजूर करणे, दिव्यांगाना प्रमाणपत्र देणे इत्यादी स्वरूपाची कामे नियोजित केलेली आहेत. याबाबत बैठकीत लोहा कंधार या दोन्ही तालुक्यातील तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल कर्मचारी यांच्या बैठकीत तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सविस्तर माहिती दिली. उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी या सेवा पंधरावाड्यात  प्रलंबित कामांचा निपटारा करावा असे सूचित केले. 

त्या अनुषंगाने शरद मंडलिक उपविभागीय अधिकारी कंधार यांच्या व व्यंकटेश मुंडे तहसीलदार लोहा कंधार यांचे उपस्थितीत दोन्ही तालुक्याचे तालुकास्तरीय अधिकारी यांची पूर्वतयारी अनुषंगाने  बैठक घेतली होती. सेवा पंधरवाडा अभियान अंतर्गत महसूल विभागाकडून करावयाचे नागरिकांची विविध कामे व द्यावयाचे विविध सेवा या अनुषंगाने या पंधरवाडा अभिनयाची प्रत्यक्ष सुरुवात तहसील कार्यालय लोहा येथे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. उपविभागीय अधिकारी मंडलिक व लोहा -कंधार चे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते लोहा तहसील कार्यालयात शिधा पत्रिका तसेच जातीचे प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र इ डब्ल्यू एस प्रमाणपत्र लाभार्थी नागरिकांना वितरित करण्यात आल्या .

नायब तहसीलदार राम बोरगावकर ,नायब तहसीलदार अशोक मोकले, नायब तहसीलदार संजय भोसीकर तसेच, लोहा व कंधार या दोन्ही तालुक्याचा कार्यालयीन स्टाफ ,तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित होते. महसूल विभागाकडून या पंधरवड्यात करावयाचे कामे जसे अतिवृष्टी अनुदान विपरीत करणे, प्रलंबित फेरफार नोंदी मंजूर करणे ,संगणकीय सातबारा कामकाज अनुषंगाने ओडिसी कामकाज करणे ,इ पीक पाहणी नोंदणी करणे ,पात्र लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र व शिधापत्रिकांचे वितरण करणे इत्यादी अनुषंगाने नियोजन करून उपविभागात सेवा पंधरवाडा अभियान ची प्रत्यक्ष अंमलबजावणी अनुषंगाने सूचना देण्यात आल्या. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी