धर्माबाद। शहरात पैगंबर यांच्या जयन्ती अति उत्साहाने साजरी करण्यात आली या निमित विविध कार्याक्रम चे आयोजन करण्यात आले होते.शहरच्या धर्माबाद कब्रिस्तान बुरहान शाह चौक येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत शहराच्या तमाम मुस्लिम बांधवानी जोश व जल्लोषात साजरी केली.
यात धर्माबाद शहराच्या सामाजिक व राजकीय पुढारयाणी आपला सहभाग नोदविला तसेच हिंदू मुस्लिम एकतेचे संदेश दिले.बुरहान शाह यांच्या मजार फूल आर्पन करून प्रसाद वाटण्याचे सुरवात करण्यात आली तसेच मस्जिदे ज़हूर व राहेर् नाका येथे खिचडी वाटप करण्यात आली.पैगम्बर मुहम्मद यानी दिलेली शिकवण हे आजच्या पिढिला शिकवण देणारी आहे हजरत मुहम्मद पैगंबरांनी केलेली सर्वात श्रेष्ठ सामाजिक सुधारणा म्हणजे त्यांनी केलेला शिक्षण प्रसार जंगली व पशू बनलेल्या मानवास सुसंस्कृत बनविण्याचे सामर्थ्य फक्त शिक्षणात आहे,
हे त्यांनी ओळखले होते. हजरत पैगंबर म्हणतात, ‘ज्ञान संपादन करा, कारण नीती व अनिती, न्याय व अन्याय, पाप व पुण्य यातील फरक ज्ञानामुळे कळतो. ज्ञानदीप स्वर्गाकडे जाणारा रस्ता दाखवितो. शिक्षण घेणे हे स्त्री-पुरुषांचे आद्य कर्तव्य आहे असे संदेश पैगम्बर यांनी तमाम मानव जातीला दिले आहे.या मिरवणुकीत माजी अध्यक्षा प्रतिनिधि अब्दुल् सत्तार, आल्ताफ भाई, माजी नगर सेवक समीर अहमद, पत्रकार म. मुबशिर,साजिद सर,ज़क्की सर,अब्दुल खदिर, लड्डा भाई,मुखीम भाई, डॉ. तोफीक पठान, रियाज भाई, आमेर पठान,मुज़मिल हुसैन,सैयद, सैयद बाबर,सरफराज, सोहेल खान, असंख्य मुस्लिम बांधव उपसतिथ होते.