हदगाव, शे.चांदपाशा| मोहम्मद पैगंबर जयंती मिलादुन्नबी दिनानिमित्त हदगाव शहरात दर वर्षी प्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.विशेष म्हणजे गेल्या ९वर्षापासुन हे रक्तादान शिबीर आयोजित करण्यात येते. या सामाजिक उपक्रमात रक्तदान शिबिराचे उद्घाटन हदगांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जगन्नाथ पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच हदगाव शहरातील शेकडो मुस्लिम युवकांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान देऊन विशेष सहभाग नोंदविला.
समाजामध्ये मोहम्मद पैगंबर यांच्या जिवन चरीञ विषयावर मुस्लिम धर्मगुरू यांनी विशेष मार्गदर्शन केले. मिलादुन्नबी निमित्त हदगाव शहरांमध्ये लहान मोठ्या मुस्लिम जन समुदाय कडुन उत्साहात रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये हजारोंच्या संख्येत मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. व तसेच उप जिल्हा रुग्णालयात या दिनानिमित्त सर्व रुग्णाला फळे वाटप करण्यात आली.
यावेळी माजी न.पा.सदस्य फेरोज पठाण, खदीरखान अँड मदनी अनवर खान समीर पटेल, बशीर मास्टर, , गुरु गोविंदसिंगजी ब्लड बँक सेंटरचे दिलीप सोनटक्के, पोलिस उप निरीक्षक संजय गायकवाड, रशिद मामु, जमीर पटेल, शेख फारुख पिंजारी, शेख खाजा, पप्पू भाई, अकबर शरीफ, शेख रफिक शेख चांद, नय्युम पटेल, साजिद टेलर्स, तमिज खान पठाण, आसिफ सेठ, हमीद पठाण, शब्बीर पठाण, अहेमद भाई, मुबिन भाई, फकिर खान रफिक वस्ताद यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन करुन विशेष परिश्रम घेतले. व हे रक्तदान शिबीर आणि फळ वाटप व रॅली शांतीमय व उत्साहात पार पाडले.