हदगाव, शे चांदपाशा| माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंञी श्रीमती सुर्यकांन्ता पाटील ह्या पुढील येणा-या हदगाव विधानसभेची निवडणूक लढविण्याचे त्यांचे स्पष्ट संकेत दिसुन येत आहे. हदगाव विधानसभा क्षेत्रांत भाजपाच्या बुथ इतर कार्यक्रमात त्या सक्रीय आहेत. इतकेच नव्हे तर विधानसभा क्षेत्रांत भाजपा कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करित असतांना 'जर पक्षाने आदेश दिल्यास आपण हदगांव विधानसभा लढवू अस अवार्जुन सागतात.
अणखीन विशेष म्हणजे मागील आठवड्यात हदगाव तालुक्यात राज्याचे महसुल मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांचे वाळकी [बाजार] या गावात नागरी सत्कारच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन नादेड लोकसभाचे भाजपा.खा प्रताप पाटील चिखलीकर यांनी तर माजी केद्रिय मंञी सुर्यकांन्ता पाटील ह्याना जाहीररित्या सागितले की, 'ताई 'आपण लोकसभेत की विधानसभेत हे ठरवा मी तुम्हाला 'शब्द' देतो की मी तुम्हांला तण मण धनाने मी आपल्याला सहकार्य करिन, मी ज्या पक्षात आहे.... त्या पक्षाचे मी प्रमाणिकपणे काम करतो. हे नादेड जिल्ह्याच्या जनतेला माहीत आहे. अस खा प्रताप पाटील यांनी सागितले.
तालुक्यातिल अश्या राजकीय घडामोडी घडत असतांना माञ काँग्रेसचे विद्यमान आ माधवराव पाटील जवळगावकर, शिवसेनेचे इच्छुक माजी आ. नागेश पाटील आष्टीकर व शिंदे गटाचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांचे विधासभेचे निवडणूकाचे राजकीय गणित बिघडणार तर नाही ना... अशी चिंता त्यांच्या कार्यकर्त्यांना होतांना दिसुन येत आहे.
माजी केद्रिंय मंञी सुर्यकांन्ता पाटील ह्या १९८०च्या दरम्यान त्यांनी हदगांव विधानसभाक्षेञाच काँग्रेस आमदार म्हणून नेतृत्व केलेले आहे. त्यानंतर खासदार राज्यसभा नंतर देशाच्या केद्रीय ग्रामीण विकास मंञी आता त्या भाजपा मध्ये शामील झाल्या. अणखी विशेष म्हणजे माजी केद्रिय मंञी सुर्यकांन्ता पाटील यांच्या आई स्वर्गीय अंजनाबाई १९५७ दरम्यान हदगांव विधानसभाक्षेञाचे नेतृत्व केले होते हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.