अर्धापूर, निळकंठ मदने| भारत जोडो यात्रेच्या राज्यातील नियोजनाची पाहणी करण्यासाठी आलेल्या काॅग्रेसच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षां,युवकचे अध्यक्ष, माजी मंत्री सभागृह नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आदि नेत्यांचे पिंपळगाव (म) वसमत फाटा, अर्धापूर,पार्डी(म) येथे भव्य स्वागत करण्यात आले, यावेळी भारत जोडो यात्रेसबंधी जागृती करण्यात आली.
काॅग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विविध जातींमध्ये तेड निर्माण करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करीत भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर पायी पदयात्रा निघाली असून,नांदेड जिल्ह्यात या यात्रेच्या नियोजन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युध्द पातळीवर सुरू असून,माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नांदेड चे नियोजन देशात नंबर १ असल्याचे चित्रफीत पाहणी कार्यकमात केले,अशोकराव चव्हाण यांनी नांदेड येथून या नेत्यांच्या पथकास पाहणीसाठी प्रारंभ केला.
यावेळी गटनेते बाळासाहेब थोरात,अ.भा.महिला काॅग्रेसच्या अध्यक्षा नेटा डिसुजा, गटनेते आ.अमरनाथ राजूरकर,माजी मंत्री डि पी सावंत,युवकचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत,माजी मंत्री शिवाजीराव मोघे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे,यशोमती ठाकूर,रमेश बावगे, काॅग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस संपतकुमार,आशीष दुआ,सोनम पटेल, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, गोविंदराव नागेलीकर, संजय देशमुख लहानकर, तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर,विनायक देशमुख,मदन देशमुख,मारोती शंकतिर्थकर, भगवान कदम,यांचा समावेश होता.
पिंपळगाव म येथे मदन देशमुख,अड सुभाष कल्याणकर, सरपंच भगवान तिडके, ज्ञानेश्वर पाटील राजेगोरे, अमोल डोंगरे,आंनंदीदास देशमुख,गजानन देशमुख,राजाराम देशमुख यांनी स्वागत केले. अर्धापूर येथे शहराध्यक्ष राजेश्वर शेटे,नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, प्रवीण देशमुख,मुसव्वीर खतीब, नासेरखान पठाण, पप्पू बेग, गाजी काजी,व्यंकटराव साखरे,सोनाजी सरोदे,सलीम कुरेशी, शंकरराव ढगे, व्यंकटी राऊत, नवनाथ बारसे,बाबाराव सरोदे,उमेश सरोदे,अबूझर बेग,शेख ,मकसुद,पंडीत शेटे,शेरु पठाण यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.
पार्डी( म) येथे सत्कार पार्डी येथे जिल्हा सचिव निळकंठराव मदने, गंगाधरराव देशमुख,हासनराव मदने, पंजाबराव देशमुख, बाबूराव साबळे,शकुराव हापगुंडे, जितेंद्र देशमुख,युनूस नदाफ, महेश देशमुख,प्रदूम मदने, कऊ मदने,ज्ञानेश्वर पांचाळ,शंकर हापगुंडे,आकाश देशमुख,श्याम गीरी, गजानन हापगुंडे,दिलीप हापगुंडे, देवीदास कांबळे,शेख गुलाब, गोविंद मदने, ज्ञानेश्वर दहिभाते,गगन दहिभाते यांची उपस्थिती होती.