रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उस्माननगर, माणिक भिसे। समाजामध्ये वावरत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे दान करीत असतो.दानशुरांची संख्याही समाजात कमी नाही.पण रक्तदान देऊन आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो.तेव्हा तरुणांनी व विशेष करून महीलांनी पुढ येऊन रक्तदान करून व्यक्तीचे प्राण वाचवावेत.कारण रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आसल्याचे महत्त्व उस्माननगर येथील श्री बजरंग दुर्गा माता मंडळाच्या वतीने व कै.शिवदर्शन साखरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताचे औचित्य साधून संयुक्त विद्यमाने दोन ऑक्टोबर रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
येथील श्री बजरंग दुर्गा माता मंडळाच्या वतीने मागील आठ दिवसांपासून विविध कार्यक्रमांतून समाज प्रबोधनाचे आयोजन करण्यात येत आहे. दोन ऑक्टोबरला दुर्गा माता मंडळाच्या समोर कै.शिवदर्शन साखरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त व श्री बजरंग दुर्गा माता मंडळाच्या वतीने महारक्तदान शिबिराचे उद्घाटन सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी काँग्रेस पक्षाचे कंधार तालुकाध्यक्ष तथा माजी सभापती बालाजी पांडागळे, उपसरपंच बाशीद शेख,आमिनशा फकीर, अशोक काळम पाटील, संजय वारकड, शिवशंकर काळे,प्रा.विजय भिसे, कमलाकर शिंदे पत्रकार प्रदीप देशमुख,लक्ष्मण कांबळे, माणिक भिसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचा सत्कार मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर रक्तदान शिबिरासाठी श्री हुजूर साब रक्त पेढी नांदेड यांच्या कडुन रक्तदात्याचे रक्तदान तपासून घेतले.यावेळी मॅनेजर प्रवीण चव्हाण,बळीराम ढेपाळे ( जनसंपर्क अधिकारी) विशाल घोडगे ( तंत्रज्ञान) नवनाथ काळे, युवराज चव्हाण यांनी रक्तदान शिबिरात मोलाचे सहकार्य व महत्त्वाची भूमिका पार पाडली .
या शिबिरात महीला सह पुरुष रक्तदान इच्छुक असे जवळपास पन्नास जनानी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. यावेळी आजच्या तरुणांनी सामाजिक बांधिलकी व हित लक्षात घेऊन राष्ट्रीय कार्याला हातभार लावावा.भारतीय संस्कृतीमध्ये भुदान, अन्नदान,विद्यादान, आणि रक्तदान यांना फार महत्त्व असले तरी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे.त्यामुळे आपण रक्तदान देऊन एखाद्याचे प्राण वाचवू शकता.तेव्हा वर्षातून एकदा तरुणांनी अवश्य तेव्हा रक्तदान करावे, रक्तदान केल्याने मानसाच्या शरीरावर काहीही परिणाम होत नाही.मानसाच्या शरीरात रक्त आपोआप निर्माण होते.समाजाचे आपण काही देणे लागतो या सामाजिक भावनेतून आपण अशा भावनेतून आपण अशा उपक्रमांत सहभागी होऊन जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान शिबिरात रक्तदान देऊन समाजाप्रती ॠण व्यक्त करावेत.
अशी तरुणांकडून अपेक्षा व्यक्त करुन या शिबिरात रक्तदान दिलेल्या महीला,तरुणांचे प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन करून या तरूणांचे महीलांचे ईतरांनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले.सदरील शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री बजरंग दुर्गा माता मंडळाचे अध्यक्ष संतोष श्रीसागर , तुळशीराम साखरे,सुमित लाटकर ( देशपांडे) ,केशव काळम, साईनाथ काळम, अंकुश काळम,श्याम काळम, चैतन्य काळम, शिवप्रसाद साखरे, विशाल साखरे, गजानन साखरे, बसवेश्वर साखरे, ओमकार साखरे,हानंमत घोरबांड,मन्मथ शेकापूरे यांनी परिश्रम घेतले.