उस्माननगर येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी -NNL


उस्माननगर।
येथील शासकीय व निमशासकीय कार्यालयात भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची व राष्ट्रपती महात्मा गांधी यांची जयंती दिनी प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड, उपसरपंच सदर बाशीद शेख, व्यंकटराव पाटील घोरबांड, गोविंद पोटजळे, संजय वारकड, शिवशंकर काळे,अंगुलिकुमार सोनसळे, गंगाधर भिसे, कमलाकर शिंदे, अशोक काळम पाटील,आमिनशा फकीर, जावेद मौलाना, कर्मचारी संजय भिसे, परमेश्र्वर पोटजळे, सद्दाम पिंजारी, ओमकार मोरे, यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित होते.सम्राट अशोक प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापक राहुल सोनसळे, भगवान राक्षसमारे, देविदास डांगे, मन्मथ केसे, नितिन लाटकर, शेख शकील, यांच्या सह शिक्षक शिक्षिका कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.अनेक विद्यार्थ्यानी आपले विचार व्यक्त केले.

जि.प.के.प्रा.शाळेत मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांच्या हस्ते पुजा करून अभिवादन करण्यात आले.यावेळी एकनाथ केंद्रे, खान, यांच्या सह शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी भारतरत्न लालबहादूर शास्त्री व राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित भाषणे झाली. प्राथमिक आरोग्य दवाखाना उस्माननगर येथे डॉ.नंदगावे, सुपरवाइझर देशपांडे, चक्रधर, यांच्यासह अधिकारी, एनएम, कर्मचारी उपस्थित होते.पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी पोस्ट मास्तर श्री.बुक्तारे, मोरे, पवार,कानगुले,कपाळे, यांच्यासह कर्मचारी हजर होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी