उस्माननगर, माणिक भिसे। सा.का.गांधीनगर केंद्राची शिक्षण परिषद पोखरभोसी ता.लोहा येथील जि.प.प्रा. शाळेत दि. ३० सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक आढाव( केंद्रप्रमुख सा.का.गांधीनगर) हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. आठवले मॅडम ( प्राचार्या डायट) श्री.चिटकुलवार ( अधिव्याख्याता डायट) श्री.देशमुख , ( अधिव्याख्याता डायट) श्री.धुमाळ ( अधिव्याख्याता डायट तथा संपर्क अधिकारी लोहा ) सौ.अंजली कापसे ( शिक्षणविस्तार अधिकारी ), श्री.संजय अकोले ( विषय तज्ञ) श्री.कातुरे ( विषय तज्ञ) कैलास गिरी ( सरपंच प्रतिनिधी पोखरभोसी) फुलाजी पा.ताटे ( उपसरपंच) कैलास पा.ताटे ( शा.व्य.स. अध्यक्ष) दयानंद पा.ताटे.( शा.व्य.स.उपाध्यक्ष) बालाजी सुर्यवंशी , सौ.मनिषा नाइनवाड ( शा.व्य.स..सदस्य )यांची प्रमुख उपस्थिती होती.
तर परिषदेला सुलभक व गटसाधन केंद्राचे साधनव्यक्ती म्हणून कौसल्ये ,कल्याण कस्तुरे , देगलूरकर हे होते. यांनी आपापल्या विषयांचे सखोल मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेच्या कार्यक्रमाची सुरूवात विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. यानंतर जि.प.प्रा. शाळेतील विद्यार्थीनी सुमधुर स्वागतगीताने सर्वांचे स्वागत करण्यात आले. स्काउट गायड चर्या विद्यार्थीनी उत्कृष्ट संचलन करून मान्यवरांना सलामी दिली. शिक्षण परिषदेला सुलभक म्हणून लाभलेले कौसल्ये,कल्याण कस्तुरे, देगलूरकर यांनी आपापल्या विषयांचे सखोल मार्गदर्शन केले.
जि.प.प्रा.शा.पोखरभोसी ता.लोहा येथील शाळेतील शिक्षिका सौ.ज्योती शिंदे यांना नुकताच राज्यस्तरीय स्काॅउट गायडचा पुरस्कार मिळाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर जि.प.प्रा.शाळा पिंपळगाव आ.येथील शिक्षक वडजे यांना महात्मा फुले शिक्षण परिषदेचा समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.तसेच केद्रस्तरावरील प्रश्नमंजूषेत व्दितीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी डायट नांदेडचे प्राचार्य तथा अधिव्याख्याता यांनी एन.ए. एस. अध्यान निष्पती विद्याप्रवेश ई.विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कुंभारगावे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.रेगुलवाड यांनी केले.शिक्षण परिषेद यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक मुळे, सौ.शिंदै,रेगुलवाड,कुंभारगावे,शेख,चव्हाण, यांच्या सह शिक्षकत्तर कर्मचारी ,यांनी परिश्रम घेतले.उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पोखरभोसी येथील केंद्राचे चौथे शिक्षण परिषदत संपन्न झाले.