हिमायतनगर। नवरात्र उत्सव साजरा करतांना प्रत्येक महिला नऊ दिवस मनोभावे देवीचे वृत्त करतात आपली संस्कृती आहे केले पाहिजे परंतु देवीचे वृत्त करतांना प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील मनातील वृत्ती बदलने काळाची गरज असुन कुणाबद्दल मनामध्ये द्वेष बाळगून कुणाचे वाईट करण्यासाठी देवीचे वृत्त धरले नाही पाहिजे प्रत्येकांसोबत सौजन्याने वागुन समाजातील एक चांगला माणूस बनायला पाहिजे असे ओम शांतीच्या ब्रम्हाकुमारी बि. के. शितल दिदी यांनी दुर्गा मंडळाच्या प्रवचनात सांगितले आहे.
हिमायतनगर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्व विद्यालय ओम शांती सेंटर च्या ब्रम्हाकुमारी बि. के.सिंधू , बि. के. शितल दिदी यांच्या प्रवचनाचे आयोजन कारला सार्वजनिक दुर्गा मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. या प्रवचनात नवरात्रीचे नऊ दिवस या बद्दल उपस्थित महिला बांधवांना मार्गदर्शन केले.
प्रवचनात बि. के. शितल दिदी म्हणाल्या की नवरात्री उत्सव साजरा करतांना नऊ दिवस महिला दुर्गा मातेचे व्रत करतात देवीचे नऊ दिवस व्रत करीत असताना आपण आपल्या घरातील परिवारा सोबत गावातील नागरीकांशी कसे वागले पाहिजे ,कुणाबद्दल मनामध्ये द्वेष ठेवू नये,वाईट चिंतन करू नये ,स्वभाव चांगला ठेवावा ,दृगूनाचा नाश करणारी दुर्गा माता आहे ,माणसातील दृगृनांना हटविणारी दुर्गा माता असुराचा नाश करणारी माता म्हणजे दुर्गा माता आहे.
मातेवर श्रद्धा ठेवून आपल्या जिवनात परिवर्तन केले पाहिजे, देवासमोर गर्वाने वागू नये असेही शितल दिदी यांनी सांगितले तर बि. के. सिंधू दिदी यांचेही प्रवचन झाले. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. दोन्ही ब्रम्हाकुमारी यांचा दुर्गा मंडळाच्या महिलांनी नारळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.