बिलोली| प्रसिध्द सिनेकलावंत आणि लोकप्रिय 'धर्मवीर' या चित्रपटाचे निर्माते, मराठी अभिनेते श्री मंगेश जीवनराव देसाई बिलोलीकर यांना बिलोली येथे अभिनेता 'जीवनगौरव पुरस्कार' देण्यात येणार असून त्यांना १ लक्ष रूपयाची रोख पारितोषित याप्रसंगी देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास मुख्य पाहुणे म्हणून येण्याबद्दल मंगेश देसाईचे हितचिंतक व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्य पाहुणे म्हणून येण्याचे निमंत्रण मा. आ. गंगाधरराव पटने यांनी मुंबई येथे भेटून दिले. मंगेश देसाई हा चांगला कार्यकर्ता व चांगला अभिनेता आहे. तुम्ही त्यांच्या गावचे व शेजारी आहात, म्हणून त्यांचा पुरस्कार देवून सत्कार करत आहात, याचा मला अभिमान आहे. म्हणून मुद्दाम या कार्यक्रमास येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले असून ते येत्या नोव्हेंबरमध्ये कार्यक्रमास येणार असे गंगाधर पटने यांनी कळविले आहे.